S M L

तिलारी घाटात कार दरीत कोसळली, 5 तरुणाचा जागीच मृत्यू

आज संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. दरीत गाडी सहित तरुण कोसळले आहे.

Updated On: Jul 8, 2018 07:04 PM IST

तिलारी घाटात कार दरीत कोसळली, 5 तरुणाचा जागीच मृत्यू

दोडामार्ग, 08 जुलै : अत्यंत धोकादायक वळण असलेल्या तिलारी घाटा नजीक असलेल्या कोदाळी येथील सुर्यास्त पॉईंट तथा लष्कर पॉईंट वरून कार  दरीत कोसळून बेळगाव येथील ५ युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीये. आज संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. दरीत गाडी सहित तरुण कोसळले आहे. सहलीचा आनंद लुटण्यासाठी हे युवक आले होते. 100 फूट खोल दरीत पडलेल्या वॅगन आर कारमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलीस आणि कोदाळीचे ग्रामस्थ करीत आहेत.

धोकादायक तिलारी घाट

तिलारी घाट हा सुमारे सात किलोमीटरचा घाटरस्ता अनेक जीवघेणी वळणे आणि तीव्र चढ-उतारांचा आहे. त्यामुळे आजपर्यंत अनेक अपघात या घाटावर झाले असून अनेकांचे प्राणही गेले आहेत.

तिलारी घाटात प्रचंड प्रमाणात जागोजागी नागमोडी वळणे आहेत. या सात किलोमीटरच्या घाटरस्त्यात वीसपेक्षा अधिक तीव्र नागमोडी वळणे असून त्यापैकी केवळ चार ते पाच वळणे ही सुरक्षित असून अन्य वळणांवर वाहतुकीस अत्यंत धोका आहे. संपूर्ण घाट रस्ता अवघा तीन ते चार मीटर इतकाच रुंदीचा आहे. जिल्ह्यातील सगळयात घाटात अत्यंत धोकादायक घाट म्हणून हा घाट ओळखला जातो.

 

मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

तर मुंबई-अहमदाबाद हायवेवर हालोली गावाजवळ रविवारी सकाळी एका इनोव्हा कारने मोटारसायकलला जबर धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, मोटारसायकलवर स्वार असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झालाय.

इनोव्हा कार अहमदाबादकडून मुंबईच्या दिशेने येत होती. भरधाव असलेल्या कारचालकाने हालोली या गावाजवळ एका मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात मोटारसायकलवर स्वार असलेल्या तिघांचा जागीच मृत्यु झाला.

मृतांमध्ये निखील काशिनाथ मेधवलेश (वय 28), निखीलची आई कामिनी काशिनाथ मेधवले (वय 55) दोघेही रा. दामखींड आणी निखीलचा भाचा पुर्मय पाटिल (वय 18) रा. गोवाडे या तीघांचा मृत्यु झालाय. मनोर पोलिसांनी इनोव्हा कार चालकास ताब्यात घेतले असून, मृत पावलेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 8, 2018 06:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close