Elec-widget

ST महामंडळाची बस कंटेनरला धडकली, 32 प्रवासी जखमी

ST महामंडळाची बस कंटेनरला धडकली, 32 प्रवासी जखमी

कोल्हापूर जिल्ह्यात पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गोकुळ शिरगाव इथं हा अपघात घडला. जखमींवर कोल्हापूरात उपचार सुरू आहेत.

  • Share this:

कोल्हापूर 12 जुलै : कोल्हापूर जवळ आज एक धक्कादायक अपघात झाला. ST महामंडळाच्या बसने रस्त्यात उभ्या असलेल्या एका मोठ्या कंटेनरला धडक दिली. या धडकेत 32 प्रवासी जखमी झालेत. उपचारासाठी त्यांना CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्ह्यात पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गोकुळ शिरगाव इथं हा अपघात घडला.

आजरा-कोल्हापूर ही एसटी बस सकाळी सव्वादहाच्या सुमारास आजरा येथून बाहेर पडली त्यांनतर दुपारी 2 वाजता गोकुळ शिरगाव येथे ही बस आली, त्यावेळी बस ड्रायव्हरने बसच्या समोर अचानक आलेल्या मोटर सायकलला वाचविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात बसचं स्टेअरिंग अचानक जाम झालं. त्यामुळे बस रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला जाऊन धडकली. या अपघातात बसमधले 32 प्रवासी जखमी झालेत.

या सर्व प्रवाशांना 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कोल्हापूरला नेण्यात आले. त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलंय. या सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

श्रीदेवींचा अपघाती मृत्यू नाही तर खूनच, IPS अधिकाऱ्याचा पुराव्यासकट दावा

रेनकोट आणला नाही म्हणून मुख्याध्यापिकेचं शाळेला कुलूप

Loading...

मुसळधार पावसामुळे रस्त्यावर आणि शाळेबाहेर पाणी साचतं आणि त्यामुळे शाळेला सुट्टी मिळते हे आपल्याला माहित आहे. पण रेनकोट घरी राहिला आणि आपण घरी जाताना भिजू या भीतीने मुख्यधापकांनी शाळेला टाळं ठोकलं आणि विद्यार्थ्यांना घरी सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पालकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात सुरक्षेच्या दृष्टीने शाळांना सुट्ट्याही देण्यात आल्या. पण जालनामधील शाळेत घडलेला प्रकार धक्कादायक आहे. मंठा तालुक्यातील कोकरंबा गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये 41 विद्यार्थी शिकतात. 1 ते 5 असे वर्ग या शाळेत भरतात. विद्यार्थी लांबून पायी चालत शाळेत येतात. पण त्याचं शाळेतील मुख्याधापकांनाच काहीच वाटत नाही असं म्हणायला लागेल.

मयंक अग्रवाल इंग्लंडला पोहचलाच कसा? निवड समितीवर भडकले गावस्कर

शाळेचे मुख्याधापक एन.व्ही आघाव हे बुलढाणा लोणार इथून कोकरंबा असा रोज प्रवास करतात. शाळेत मुख्याधापक वेळेवर न येणं, शाळेचे नियम मोडले जाणं, शिक्षक वर्गात न येणं, मुख्याधापकांच्या आणि शिक्षकांच्या सुट्ट्या अशा तक्रारी वारंवार केल्या होत्या. त्यात आता आघाव यांनी केलेल्या प्रकारामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 03:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...