मनोज कुळकर्णी (प्रतिनिधी)मुंबई, 16 जून: भांडुपहून विक्रोळीला जाणाऱ्या कारने भर रस्त्यात अचानक पेट घेतला. त्यामुळे परिसरात धांदल उडाली काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. आग लागताच कारमधील दोन्ही तरुणांनी बाहेर उडी घेतल्यानं सुखरुप आहेत. मात्र कारचं मोठं नुकसान झालं.