S M L

'पद्मावत'च्या विरोधात बेळगावमध्ये स्फोट घडवण्याचा हिंदुत्ववाद्यांचा होता प्लॅन!

पुण्यातील सनबर्न वेस्टर्न म्युझिक कॉन्सर्टमध्ये बॉम्बस्फोट घडवायचा हिंदुत्ववाद्यांचा कट होता अशी धक्कादायक माहिती समोर आलीये

Updated On: Aug 28, 2018 05:14 PM IST

'पद्मावत'च्या विरोधात बेळगावमध्ये स्फोट घडवण्याचा हिंदुत्ववाद्यांचा होता प्लॅन!

मुंबई, 28 आॅगस्ट : संजय लिला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत सिनेमाला करणी सेनेनं कडाडून विरोध केला होता. देशभरात ठिकठिकाणी हिंसक निदर्शनं करण्यात आली होती. मात्र, आता नालासोपरा स्फोटक प्रकरणात बेळगावमध्ये हिंदुत्ववाद्यांनी बाॅम्बस्फोट घडवण्याचा कट रचला होता अशी माहिती समोर आलीये. या प्रकरणी कल्याणमध्ये गुन्हाही दाखल झाला होता.

नालासोपारा स्फोटक जप्ती प्रकरणी अटकेत असलेल्या शरद कळसकरच्या कॉम्प्युटरमधून ही माहिती डीकोड करण्यात आल्याचं आज एटीएसनं कोर्टासमोर सांगितलं. आज वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या तिघांना मुंबई सत्र न्यायालयानं हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टानं तिघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. तर सीबीआयनेही शरद कळसकरची सीबीआय कोठडी मागितली आहे.

सनबर्न फेस्टिव्हल निशाण्यावर

नालासोपारा स्फोटक प्रकरणी वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांची आज पोलीस कोठडी संपणार होती. या तिघांना मुंबई सत्र न्यायालयानं दहा दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्याचा आज शेवटचा दिवस होता तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलंय. यावेळी एटीएसच्या वकिलांनी कोर्टात धक्कादायक माहिती सांगितली.

पुण्यातील सनबर्न वेस्टर्न म्युझिक कॉन्सर्टमध्ये बॉम्बस्फोट घडवायचा हिंदुत्ववाद्यांचा कट होता अशी धक्कादायक माहिती समोर आलीये.तसंच बेळगावमध्ये पद्मावत सिनेमाच्या शोला विरोध म्हणून स्फोट घडवायचा होता अशी माहिती समोर आली. नालासोपारा स्फोटक जप्ती प्रकरणी अटकेत असलेल्या शरद कळसकरच्या कॉम्प्युटरमधून ही माहिती डीकोड करण्यात आल्याचं आज एटीएसनं कोर्टासमोर सांगितलं. आज वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या तिघांना मुंबई सत्र न्यायालयानं हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टानं तिघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.

शरद कळसकरकडून मिळालेल्या काॅम्प्युटरमधून माहिती डीकोड करण्यात आली आहे. पुण्यात त्याला वेस्टर्न म्युझिक काॅन्सर्ट करत असलेल्या ठिकाणी बाॅम्बस्फोट घडवायचा होता, तसंच बेळगांव इथं पद्मावत शो च्या इथं बाॅम्बस्फोट करायचे होते. हे सगळं हिंदू संस्कृती विरोधात आहे असं म्हणत त्यांना ते करायचं होतं अशी माहिती वकिलांनी दिली. राऊत आणि गोंधळेकर यांच्याकडचा माहितीही डिकोड करण्यात आली आहे. यांनाही पाश्चिमात्य संगीताच्या कार्यक्रमात स्फोट करायचे होते. यांची शस्त्रं एमपी, युपी आणि कर्नाटकातून आली आहेत असंही समोर आलंय. तसंच एटीएसला या दोघांना त्या ठिकाणी न्यायचं आहे ज्या ठिकाणीही प्रशिक्षण देण्यात आलंय. यांची प्रशिक्षण केंद्र दोन महाराष्ट्रात आहेत बाकी सगळी बाहेर आहेत असंही समोर आलंय.

अमोल काळेच मास्टरमाईंड

दरम्यान, कर्नाटक एसआयटीच्या चौकशीत आरोपी अमोल काळेनं अनेक मोठे खुलासे केले आहेत. कॉम्रेड पानसरे, एमएम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा मास्टरमाईंड अमोल काळेच होता या तिन्ही हत्या एकाच पिस्तुलानं केल्याचंही काळेनं सांगितलंय. या पिस्तुलाला या हल्लेखोरांनी सुदर्शन चक्र असं नाव दिलं होतं. का तर सुदर्शन चक्र हे श्रीकृष्णाचं शस्त्र होतं म्हणून, ही बाबही चौकशीतून उघड झाली आहे. दुसरी गोष्ट अशी की तिघांच्या हत्येचा कट रचण्यामध्ये अमित डेगवेकर आणि राजेश बंगेरांचाही हात होता, आणि अमोल काळे या कटाचा मास्टरमाईंड होता. काळे हा मास्टर प्लॅनर होता, डेगवेकरनं पैशांची व्यवस्था केली आणि बंगेरानं शस्त्र प्रशिक्षण आणि वाहनाची व्यवस्था केली, असं तपासात उघड झालं आहे.

बैलगाडी शर्यतीत आला पहिला, अतिउत्साहात गाडीतून गेला तोल, आणि...! VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2018 05:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close