News18 Lokmat

पोलिसांच्या नावाचा वापर करून लाकूड तस्करी करणारी टोळी जेरबंद

पोलिसांच्या नावाचा वापर करून लाकडांची तस्करी करणाऱ्या टोळीचा ठाणे वनविभागाने पर्दाफाश केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 7, 2018 08:16 PM IST

पोलिसांच्या नावाचा वापर करून लाकूड तस्करी करणारी टोळी जेरबंद

 अजित मांढरे, ठाणे,ता. 7 सप्टेंबर : जंगलांनी समृद्ध असलेल्या ठाणे जिल्ह्यात तस्करांचे कारनामे वनाधिकाऱ्यांनी उघड केले आहेत. चंदन आणि सागवानसारख्या मौल्यवान झाडांच्या लाकडांची तस्करी करण्यासाठी या तस्करांनी गाड्यांवर चक्क पोलीस उपायुक्त म्हणजेच DCP आणि पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI अशा पाटया पोलीस अधिकाऱ्यांच्या नावासहीत ट्रकवर लावल्या. अशा पाट्या लावल्याने पोलीस पकडणार नाहीत असा तस्करांचा उद्देश होता. अशी तस्करी सुरू असल्याची खबर वनाधिकाऱ्यांना लागली आणि त्यांनी अशा गाड्या पकडल्या त्यानंतर तस्करांचा हा डाव उघड झाला.

अशी होते तस्करी

  •  एप्रिल आणि गस्ट महिन्यात केलेल्या कारवाईत १४ कोटींपेक्षा जास्त किंमतीचे खैरांचे ओंडके जप्त केले होते.

Loading...

  •  पडघ्याहून-चिपळूणमधील सावर्डे, पालवन, निवळी येथे खैरांच्या ओंडक्याची तस्करी केली जाते.

  •  चिपळूणला काथ आणि गुटखा बनवण्याचे कारखाने आहेत.

  •  खैराचे झाड राखीव प्रजाती असल्याने तोडण्याची परवानगी नाहीये.

  • एका खैराच्या ओंडक्यात ७० टक्के काथ निघते जे बाजारात ७०० ते ८०० रुपये किलो या दराने विकले जाते.

  •  खैराच्या लाकडाची तस्करी करताना आढळल्यास भारतीय वन अधिनियमानुसार ५०० ते १००० रुपये दंड आणि २ वर्षे कारावासाची शिक्षा आहे तर जैव वैविधता कायदा लावल्यास ५ वर्षे शिक्षा होऊ शकते. 

     

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2018 08:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...