ठाणे पोलिसांचा इंदूरमधील कॉल सेंटरवर छापा, चालत होता हा 'गोरखधंदा'

ठाणे पोलिसांचा इंदूरमधील कॉल सेंटरवर छापा, चालत होता हा 'गोरखधंदा'

ठाणे पोलिसांनी शेजारील राज्य मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील एका कॉल सेंटरलर छापा टाकून गोरखधंद्याचा पर्दाफाश केला.

  • Share this:

ठाणे, 21 जुलै- ठाणे पोलिसांनी शेजारील राज्य मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील एका कॉल सेंटरलर छापा टाकून गोरखधंद्याचा पर्दाफाश केला. शेअर बाजार गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम) अनिल कुंभारे यांनी दिलेली माहिती अशी की, कळवा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली त्याला फोन करून आरोपींनी सव्वा दोन लाखाला चूना लावला होता. नंतर आरोपी तक्रारदार व्यक्तीचा फोन उचलत नव्हते. चौकशीअंती पीडित व्यक्तीला आलेला फोन कॉल इंदूर येथून आल्याचे समोर आले. ठाणे पोलिसांनी थेट इंदूर गाठून कॉल सेंटरवर छापा टाकून आरोपी अरविंद चौहान (26) आणि तापेश शर्मा (22) या दोघांना अटक केली. पोलीस आयुक्तांनी सांगितले की, आरोपींनी गुरुवारी (18 जुलै) अटक करून त्यांच्याकडून 59 हार्ड डिस्क, 29 वायरलेस फोन, चार मोबाइल जप्त करण्यात आले आहे. दोन्ही आरोपींनी शेअर बाजार गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेकांची आर्थिक फसवणूक करून त्यांना कोट्यवधी रुपयांनी चूना लावला आहे.

नाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका

मुंबईतील अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नाईट लव्हर बारमध्ये नार्कोटिक्सचे डीसीपी शिवदीप लांडे यांनी छापा टाकला. मिळालेली माहिती अशी की, शनिवारी मध्यरात्री नार्कोटिक्स विभागाने ही कारवाई केली. बारमधील 14 तरुणींची सुटका करण्यात आली. 15 ग्राहकांसह बार मॅनेजर, सुपरवायझर आणि कॅशियरला अटक करण्यात आली आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करत आहेत.

पोलिसांचा आता नवा फंडा, खाद्यांवर लागणार LED दिवे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2019 10:01 PM IST

ताज्या बातम्या