S M L

पोलीस भरतीसाठी फक्त 238 जागा, आले 49 हजार उमेदवार; इंजिनिअर,डाॅक्टरांचाही समावेश

ठाणे पोलीस दलात २०१८ या वर्षाची भरती प्रक्रिया बुधवारपासून साकेत मैदानावर सुरू करण्यात आली आहे

Sachin Salve | Updated On: Mar 15, 2018 09:20 AM IST

पोलीस भरतीसाठी फक्त 238 जागा, आले 49 हजार उमेदवार; इंजिनिअर,डाॅक्टरांचाही समावेश

15 मार्च : महाराष्ट्रात नोकऱ्यांची उपलब्धता किती कमी आहे, याचा प्रत्यय ठाण्यात सुरू असलेल्या पोलीस भरतीमुळे आलाय. अवघ्या 238 शिपाईपदाच्या भरतीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपरयातून 49 हजार 32 बेरोजगारांनी अर्ज केलाय. एवढंच नाहीतर यामध्ये एमबीए, इंजिनिअर, डाॅक्टर सुद्धा सहभागी आहे.

ठाणे पोलीस दलात २०१८ या वर्षाची भरती प्रक्रिया बुधवारपासून साकेत मैदानावर सुरू करण्यात आली आहे. ठाणे आयुक्तालयात 238 पोलीस शिपाई पदाच्या जागा रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आल्यानंतर तब्बल 49 हजार 32 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रतिदिन 2500 उमेदवारांच्या मैदानी चाचण्या, 100 मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक आणि 1600 मीटर धावणे या मैदानी चाचण्या बुधवारपासून सुरू करण्यात आल्या असून सर्वच उमेदवारांच्या मैदानी चाचण्या 4 एप्रिलपर्यंत पूर्ण होतील अशी अपेक्षा अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे यांनी व्यक्त केली. मैदानी चाचण्यानंतर या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

दरम्यान, पोलीस दलात भरती होण्यासाठी आलेले पदवीधर उमेदवार याबाबत भरती कमी प्रमाणात होत असल्याचं सांगत आहेत. या आलेल्या उमेदवारामध्ये अनेक जण हे एमबीए, इंजीनियर आणि वेटर्निटी डॉक्टर देखील आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2018 09:20 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close