News18 Lokmat

‘...तर खळ्ळ खटॅक करू’, छटपूजेवरून मनसे पुन्हा आक्रमक

‘ठाण्यातील तलावाच्या काठी गणेशोत्सवामध्ये निर्माल्य नेण्यास बंदी आहे. मग छटपूजेला तलावाकाठी निर्माल्य नेण्यास कशी परवानगी दिली जाते?'

News18 Lokmat | Updated On: Nov 10, 2018 05:04 PM IST

‘...तर खळ्ळ खटॅक करू’, छटपूजेवरून मनसे पुन्हा आक्रमक

अजित मांढरे,ठाणे, 10 नोव्हेंबर : ठाण्यामध्ये 10 नोव्हेंबरला होणा-या छटपूजेच्या आधीच वातावरण तापलं आहे. 'गणेशोत्सवात निर्माल्य नेण्यास बंदी असते, तशीच बंदी छटपूजेमध्येही करावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन केलं जाईल,' असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

‘ठाण्यातील तलावाच्या काठी गणेशोत्सवामध्ये निर्माल्य नेण्यास बंदी आहे. मग छटपूजेला तलावाकाठी निर्माल्य नेण्यास कशी परवानगी दिली जाते? त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस घाणीचे साम्राज्य पसरते. त्याला जबाबदार कोण? असं म्हणत मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे.

येत्या 13 नोव्हेंबरला छटपूजा आहे. यावेळी उपवन, तलावपाळी तसंच अन्य तलावांच्या काठी छटपूजा केली जाते. यावेळी मोठ्या प्रमाणात हार, फुलं आणि इतर साहित्य वापरलं जातं. मात्र पूजा झाल्यानंतर हे साहित्य तसंच सोडून दिलं जातं. यामुळे ते निर्माल्य कुजून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.

‘फक्त मराठी सणांवरच नियमांची जबरदस्ती का?’ असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केल्याने ठाण्यात राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे छटपूजेच्या दिवशी मनसे कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान,छटपूजा हा उत्सव उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि नेपाळ अशा भारतातील पूर्व भागात साजरा केला जातो. उत्तर भारतीयांच्या वाढत्या वास्तव्यामुळे आता महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर छटपूजा करण्यात येते.

Loading...


VIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतलंबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 10, 2018 03:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...