S M L

ठाणे : सिगारेटमुळे पेटला येऊरच्या जंगलात वणवा

ही लागलेली आग वणवा नसून काही टवाळ मुलांच्या सिगारेट पेटवण्याच्या प्रकारामुळे लागलीये असं काही स्थानिकांचं म्हणणंय

Sachin Salve | Updated On: Mar 24, 2018 09:30 PM IST

ठाणे : सिगारेटमुळे पेटला येऊरच्या जंगलात वणवा

24  मार्च : बोरिवली नॅशनल पार्कच्या येऊर भागातील जंगलात साधारण दुपारी २ च्या सुमारास वणवा पेटला होता. स्थानिक गावकरी आणि वन विभागाच्या अधिका-यांनी मिळून शर्थीचे प्रयत्न करुन तो वणवा विझवला. तब्बल ३ तास कोणत्याही यंत्रणेविना ही आग विझवण्यात आलीये. पण हा वनवा एका सिगारेटमुळे पेटला असल्याचं समोर आलं.

येऊर भागातील जंगलात शुक्रवारी वणवा पेटला होता. अचानक लागलेल्या आगीमुळे जंगलातील बराचला भाग जळाला असून यामुळे मोठी वनहानी झाली आहे. ही लागलेली आग वणवा नसून काही टवाळ मुलांच्या सिगारेट पेटवण्याच्या प्रकारामुळे लागलीये असं काही स्थानिकांचं म्हणणंय. त्यामुळे आता वन विभागाचे अधिकारी या घटनेचा तपास करताहेत.

ही लागलेली आग किती भयानक होती आणि ती विझवण्याकरता स्थानिक तरुणांनी देखील प्रयत्न केलेत. वनधिकारी अनंत घरत बाळकृष्ण सावंत, विद्यार्थी राजेश ठाकूर, सचिन भोईर, सुशमित गरुड, ओमकार श्रीवास्तव, नुपूर पाठक, सिद्धार्थ अंगणे या विद्यार्थ्यांसह वन अधिकाऱ्यांचं कौतुक केलं जात.य.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2018 09:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close