News18 Lokmat

ठाण्यात पेव्हर ब्लॉकनं घेतला डाॅक्टराचा जीव

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 8, 2017 11:44 PM IST

ठाण्यात पेव्हर ब्लॉकनं घेतला डाॅक्टराचा जीव

08 डिसेंबर : रस्त्यावरच्या पेव्हर ब्लॉकनं ठाण्यातल्या एका डॉक्टरचा जीव घेतलाय. डॉ. प्रकाश वझे यांच्या दुचाकीला अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालाय.

ठाण्यातील आनंदनगर चेक नाका टोलनाक्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज दुपारी  डॉ. प्रकाश वझे यांच्या दुचाकीला अपघात झाला. सिमेंट काँक्रीटचे रस्ते आणि त्याच्या बाजूला असलेल्या असमान पेव्हर ब्लॉकमुळे डॉ. प्रकाश वझे यांची दुचाकी घसरली. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकनं त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.  त्यांच्यासोबत असलेला त्यांचा सहकारी कंपाउंडर नागप्पा हेडगे गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई क्रिकेट संघटनेचे सुवर्णपदक विजेते क्रिकेट अंपायर आणि डॉक्टर अशी त्यांची ख्याती होती. डॉ. प्रकाश वझे हे प्रसिद्ध क्रीडाप्रेमी आहेत. त्यांची वझे स्पोर्ट्स अकादमीसुद्धा आहे. पण एका पेव्हर ब्लॉकनं त्यांचा आज जीव घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 8, 2017 11:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...