काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना साताऱ्याचे जवान रवींद्र धनावडेंना वीरमरण

साताऱ्यातील मेढा येथील मोहाट गावचे सुपूत्र रवींद्र बबन धनावडे शहीद झाले आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2017 06:33 PM IST

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना साताऱ्याचे जवान रवींद्र धनावडेंना वीरमरण

26 आॅगस्ट : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केलाय. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहे. तर तीन जण जखमी झाले आहे. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत साताऱ्याचे जवान रवींद्र बबन धनावडे शहीद झाले आहे.

आज पहाटे दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वसाहतीवर आत्मघातकी हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर तत्काळ सीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आलंय. अजूनही तिथे चकमक सुरू आहे. काही दहशतवादी हे इमारतीमध्ये घुसून बसले आहे. या चकमकीत आतापर्यंत सीआरपीएचे जवान आणि पोलीस शहीद झाले आहे. सीआरपीएफ जवानांनी घटनास्थळाचा ताबा घेतलाय. दहशतवादी आणि जवानांमध्ये दिवसभर गोळीबार सुरू होता.

या हल्ल्यात सीआरपीएफचे 2 जवान तर काश्मीर पोलिसांचे  3  कर्मचारी शहीद झाले. सीआऱपीएफच्या 2 जवानांपैकी एक जवान सातारा जिल्ह्यातला आहे. रवींद्र बबन धनावडे असं या जवानाचं नाव आहे. शहीद धनावडे हे मुळचे साताऱ्याच्या मेढामधल्या मोहाट गावचे आहेत.

पोलीस वसाहतीबाहेर मोठ्याप्रमाणावर जवान तैनात कऱण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी प्राधान्य दिलं ते रहिवाशांना बाहेर काढण्यावर. कारण रहिवाशांना ओलीस ठेवलं जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण दुर्दैवानं रहिवाशांना वाचवताना 5 जवानांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. दहशतवाद्यांविरोधातील आॅपरेशन अंतिम टप्यात पोहोचलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2017 06:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...