S M L

माहूरमध्ये तणाव, शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

माहूर तालुक्याचा समावेश हिंगोली लोकसभा मतदारसंघात आहे. शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ 15 तारखेला झालेल्या जाहीर सभेत भाजप कार्यकर्ता सुमेध राठोड याने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याबद्दल खालच्या पातळीवर टीका केली

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 07:34 PM IST

माहूरमध्ये तणाव, शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी


माहूर, 19 एप्रिल- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना नांदेड जिल्ह्यातील माहूरमध्ये शिवसेना- भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या पार्श्वभूमीवर माहूर शहरात तणाव पसरला आहे.

माहूर तालुक्याचा समावेश हिंगोली लोकसभा मतदारसंघात आहे. शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ 15 तारखेला झालेल्या जाहीर सभेत भाजप कार्यकर्ता सुमेध राठोड याने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याबद्दल खालच्या पातळीवर टीका केली होती. त्याचा राग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये होता. मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्ता सुमेध राठोड याला आणि त्याच्या सहका-यांना बेदम मारहाण केली होती. ही घटना कळाल्यानंतर शिवसेना तालुका प्रमुखाने राष्ट्रवादीच्या नगरअध्यक्षाच्या दुकानावर जाऊन याबाबत जाब विचारला. या ठिकाणी पुन्हा राष्ट्रवादी आणि सेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले. दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याने शहरात तणाव पसरला आहे. हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला आहे.


पोलीस म्हणाले, परिस्तिथी नियंत्रणात

दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, घटनेनंतर माहूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.


Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 07:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close