पुणे-सातारा महामार्गावर 32 मजुरांनी भरलेला टेम्पो उलटला; 18 जण ठार

पुणे-सातारा महामार्गावर 32 मजुरांनी भरलेला टेम्पो उलटला; 18 जण ठार

आयशर टेम्पो पलटी होऊन त्यात 18 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर काही जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येतेय.

  • Share this:

10 एप्रिल : पुणे - सातारा महामार्गावर खंडाळा गावाच्या एस टर्नवर भीषण अपघात झालाय. आयशर टेम्पो पलटी होऊन त्यात 18 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर काही जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येतेय.

सुत्रांच्या माहितीनुसार, हा टेम्पो मजुरांनी भरलेला होता. तो साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जात असताना या टेम्पोला भीषण अपघात झाला. टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो थेट दरीत कोसळला. गंभीर बाब म्हणजे या टेम्पोमध्ये एकूण 32 कामगार प्रवास करत होते. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

दरम्यान, खंडाळा या एस टर्नजवळ आतापर्यंत अनेक अपघात झाले आहे. हा रस्ता चुकीच्या मार्गाने बनवला असल्याची तक्रारही प्रवाशांकडून करण्यात येत आहे. पण त्यामुळे सातारा रोडवरील 'एस' वळण हे मृत्यूचा सापळा ठरतंय असं म्हणायला हरकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2018 07:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...