S M L

काळजी घ्या!, येत्या 48 तासात तापमान वाढणार

नाशिक, नगर आणि जळगांव जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीये

Sachin Salve | Updated On: Apr 28, 2018 06:20 PM IST

काळजी घ्या!, येत्या 48 तासात तापमान वाढणार

मुंबई, 28 एप्रिल : येत्या 48 तासांमध्ये तापमानात वाढ असल्याचा हवामान खात्याने इशारा दिलाय. नाशिक, नगर आणि जळगांव जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीये

गेल्या काही दिवसांपासून मालेगावात सूर्य आग ओकत असून तापमानाने थेट ४४.८ अंशाचा पल्ला गाठलाय. तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. कडक उन्हामुळे लोकांना घरा बाहेर पडणे कठीण झाल्याने सर्व रस्त्यावर शुकशुकाट पसरलाय. सध्या मोठ्या प्रमाणात लग्नसराई सुरू असून तापमान वाढीचा सर्वात जास्त फटका वराडी मंडळी सोबत झोपटपट्टीत राहणाऱ्यांना बसतोय.

दुसरीकडे मात्र आज मनमाडला ढगाळ वातावरण होते त्यामुळे कालच्या तुलनेत आज तापमानात काही अंशी घट झाली असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला मात्र रोज तासंतास वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2018 06:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close