News18 Lokmat

अकोला सर्वाधिक हॉट, पारा 46 अंशावर.. विदर्भात उष्णतेची लाट पुढील 4 दिवस कायम राहणार

विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आली आहे. अकोल्यात तापमानाने चांगलाच जोर धरला आहे. अकोल्यात पारा 46.3 डिग्रीच्यावर पोहोचला आहे. उष्णतेची ही लाट पुढील 4 दिवस कायम राहणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2019 07:26 PM IST

अकोला सर्वाधिक हॉट, पारा 46 अंशावर.. विदर्भात उष्णतेची लाट पुढील 4 दिवस कायम राहणार

हर्षल महाजन (प्रतिनिधी)

नागपूर/अकोला- विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आली आहे. अकोल्यात तापमानाने चांगलाच जोर धरला आहे.  अकोल्यात पारा 46.3 डिग्रीच्यावर पोहोचला आहे. उष्णतेची ही लाट पुढील 4 दिवस कायम राहणार आहे. संपूर्ण विदर्भात या उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज आहे. यंदाच्या मोसमातील हा उच्चांक आहे. उष्णतेची ही लाट पुढील 4 दिवस कायम राहणार आहे. संपूर्ण विदर्भात या उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे, आवाहन आरोग्य विभागाचे विभागीय संचालक संजय जैस्वाल यांनी केले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 47 रुग्ण उष्णतेमुळे विविध रुग्णालयात दाखल असतांना देखील अद्याप शासकीय रुग्णालयांमध्ये शीतकक्ष (कोल्ड वॉर्ड) सुरूच झाले नाही.

एप्रिल महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात तापमानातील ही वाढ मे महिन्यातील उष्णतेची चिंता वाढवत आहे. विदर्भातील आजच्या तापमानातील अकोला हे सर्वात जास्त 'हॉट' राहिले. गेल्या आठ दिवसांपासून तापमानामध्ये होत असलेला चढ-उतार आणि मधातच दोन दिवस ढगाळ वातावरणामुळे अकोल्यातील उष्णतेची लाट कमी झाली होती. तर गेल्या तीन दिवसांपासून अकोल्याचे तापमान 41 ते 43 अंशाच्या जवळपास राहिले. हळूहळू सूर्य आग ओकत आहे. अकोल्याचे आजचे तापमान 46.3 अंश होते. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील या तापमानाने विदर्भाचा उष्णतेच्या जिल्ह्यांमध्ये मे महिन्याआधीच पहिला क्रमांक लावला. या कडक उन्हामुळे आज शहरात नागरिकांना दैनंदिन कामजात कमालीचा त्रास सहन करावा लागला. अंगाला चटके लागणारे हे उन अकोलेकरांना आज थक्क करून गेले. उन्हापासून बचावासाठी नागरिक शीतपेय, पंधरा रुमलाचा वापर करून बव्हाव करण्याचा प्रयत्न करत होते.

विदर्भात सर्वदूर गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर तापमानात घट झाली होती पण पुन्हा विदर्भात तापमानवाढीला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर वगळता सगळ्याच जिल्ह्यांमधील तापमान 40 अंशांपेक्षा कमी झाला होते. मात्र आता ही परिस्थिती बदलली आहे आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधील तापमान 40 अंशांपेक्षा अधिक झाले. तर सर्वाधिक तापमान अकोल्यात पारा 45 डिग्रीच्यावर पोहचला आहे.

- एम. एल. साहू, डीजी, प्रादेशिक हवामान विभाग

Loading...

अंगाची लाही लाही होत असताना उष्माघाताच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे विदर्भात उष्माघाताचे 47 रुग्ण विविध दवाखान्यात उपचारासाठी दाखल आहेत. गेल्या वर्षी नागपुरात 364 रुग्णांची नोंद झाली होती. यावर्षी जानेवारी ते आतापर्यंत 47 रुग्ण आढळून आले आहेत. मेयो, मेडिकलमध्ये मात्र, अद्यापही शीतकक्ष (कोल्ड वॉर्ड) सुरूच झाले नाही.

विदर्भात कोणत्या जिल्ह्यात किती तापमान..

अकोला- 46.3

अमरावती- 45.0

बुलडाणा- 42.5

ब्रह्मपुरी- 45.5

चंद्रपूर- 45.4

गडचिरोली-43.0

गोंदिया-39.8

नागपूर-44.3

वर्धा- 45.5

वाशिम- 43.8

यवतमाळ-44.5

उन्हापासून कसे करावे रक्षण...

काय करावे..

- भरपूर पाणी प्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा.

- फिक्कट रंगाचे सैल कपडे वापरा.

- उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा.

- पाळीव प्राण्यांना सावलीत, थंड ठिकाणी ठेवा.

- कुलर, ओलसर ताट्या, पंखा यांच्या मदतीने घर थंड ठेवा.

काय करू नये...

- उन्हाच्या वेळेत बाहेर जाणे टाळा.

- पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका.

- भडक रंगाचे, तंग कपडे वापरू नका.

- खुप प्रथिनयुक्त अथवा शिळे अन्न खाऊ नका.


VIDEO : 'दार तोडून घरात आले आणि माझ्या भाच्याला, भावजाईला मारलं'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 07:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...