राज्यात थंडीचा कडाका; अनेक ठिकाणी तापमानात घट

राज्यात थंडीचा कडाका; अनेक ठिकाणी तापमानात घट

पुढील काही दिवसांत गुलाबी थंडीचा सामना नागरिकांना करावा लागण्याची शक्यता आहे. रविवारी मुंबई आणि पुणे शहरांच्या तापमानात दोन ते तीन अंशाने घट झाली.

  • Share this:

13 नोव्हेंबर: यंदा दिवाळीत प्रचंड पाऊस झाला असला तरी आता राज्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबई, पुण्यासह राज्यभरामधील कमाल आणि किमान तापमानात घट होत चालली आहे.

पुढील काही दिवसांत गुलाबी थंडीचा सामना नागरिकांना करावा लागण्याची शक्यता आहे. रविवारी मुंबई आणि पुणे शहरांच्या तापमानात दोन ते तीन अंशाने घट झाली.

कोरडं झालेलं हवामान आणि उत्तरेकडून सुरू झालेले वारे यामुळे तापमानात घट होऊ लागली आहे. किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही घट झाली आहे. मुंबईचे कमाल तापमान ३५ अंश सेल्सियसवरून ३३ अंश सेल्सियसवर तर किमान तापमानात २१ अंश सेल्सियसवरून २० वर उतरले. मुंबई आणि उपनगरामध्ये पहाटे काही प्रमाणात धुकेही दाटू लागलं आहे. पुणे शहराचे कमाल तापमान २९.६ अंश सेल्सियसवरून रविवारी २१.६ अंश सेल्सियसवर तर किमान तापमान १३.७ अंश सेल्सियसवरून ११.५ अंश सेल्सियसवर घसरले. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसंच राज्यात इतरही ठिकाणी तापमानात घट होते आहे.

राज्यातील विविध ठिकाणचे तापमान

नाशिक - 10.4

निफाड - 10.8

नागपूर - 12.4

सोलापूर - 12.5

महाबळेश्वर - 13

सातारा - 13

नांदेड - 13

अकोला - 13.1

औरंगाबाद -13.2

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2017 11:15 AM IST

ताज्या बातम्या