मुंबईसह राज्यात थंडीचा कडाका

नाशिक नागपूर,पुणे या तिन्ही शहरांमध्ये पारा 10 अंशाच्या खाली घसरलाय.

Chittatosh Khandekar | Updated On: Jan 8, 2018 10:51 AM IST

मुंबईसह राज्यात थंडीचा कडाका

08 जानेवारी: मुंबईसह राज्यात थंडीची लाट पसरली आहे. नाशिक पुणे आणि नागपूर या महत्त्वाच्या शहरांना थंडीने हुडहुडी भरली आहे.

नाशिक नागपूर,पुणे  या तिन्ही शहरांमध्ये पारा 10 अंशाच्या खाली घसरलाय.  राज्यात येत्या काही दिवसात थंडी वाढणार असून, राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागात पारा सरासरीपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेनं हा अंदाज वर्तवला आहे. उत्तर भारतातून थंड हवा महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे. त्यामुळे थंडी जास्त पडत असल्याचं कुलाबा वेधशाळेनं सांगितलं आहे. त्यामुळे  राज्यातील लोकांना अजून काही दिवस तरी  या थंडीचा कडाका सहन करावा लागणार आहे.

राज्यातील तापनान  (अंश सेल्सिअस)

मुंबई     16

ठाणे     25

रायगड 18

रत्नागिरी 18

सिंधुदुर्ग 17

पुणे       11

नाशिक 08

कोल्हापूर 16

सांगली 14

सातारा 12

जळगाव 9

अहमदनगर 10

सोलापूर 16

उस्मानाबाद 16

बीड 12

औरंगाबाद 11,

बुलढाणा 13

परभणी 11

नांदेड 13

अमरावती 12

नागपूर 9

वर्धा 9

यवतमाळ 12

चंद्रपूर 10

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2018 10:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close