गणेशोत्सवात मुंबई-गोवा तेजस एक्सप्रेसमध्ये मिळणार उकडीचे मोदक

गणेशोत्सवात मुंबई-गोवा तेजस एक्सप्रेसमध्ये मिळणार उकडीचे मोदक

गणेश उत्सवाच्या काळात रेल्वेचे बुकिंगही फुल झाले असतात. याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवाशांना तेजस एक्सप्रेसच्या मेनू कार्डमध्ये मोदक उपलब्ध करून देऊन कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास अजून गोड करण्याचा प्रयत्न करणार आहे.

  • Share this:

13 ऑगस्ट: अत्याधुनिक वेगवान तेजस एक्स्प्रेसमध्ये गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना उकडीचे मोदक पुरवण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे. मुंबई -गोवा  तेजस एक्सप्रेसच्या  मेनूमध्ये गणेशोत्सवाच्या काळात उकडीचे मोदकही असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबईतील नोकरदार मोठ्या संख्येने कोकणात रेल्वेने प्रवास करतात. गणेश उत्सवाच्या  काळात रेल्वेचे बुकिंगही फुल झाले असतात. याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवाशांना तेजस एक्सप्रेसच्या मेनू कार्डमध्ये मोदक उपलब्ध करून देऊन कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास अजून गोड करण्याचा प्रयत्न करणार आहे.

मागच्या वर्षी गणेश उत्सवाच्या काळात मुंबई दिल्ली राजधानी एक्सप्रेसमध्येही मोदक उपलब्ध करून देण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2017 09:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...