Elec-widget

हायटेक 'तेजस' आजपासून रुळांवर, मुंबई-गोवा फक्त 8 तासांत

हायटेक 'तेजस' आजपासून रुळांवर, मुंबई-गोवा फक्त 8 तासांत

  • Share this:

मंगेश चिवटे, 22 मे :तेजस एक्स्प्रेस आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. 8 तासात मुंबई गोवा अंतर पार करणारी लक्झरीयस एक्स्प्रेस असं हीचं वर्णन करता येईल. सुरुवातीला आठवड्यातून 5 दिवस आणि प्रवाशांच्या प्रतिसादावरून सातही दिवस ही एक्प्रेस धावेल असं मध्य रल्वेनं जाहीर केलंय.

तेजस एक्सप्रेस ही प्रवाशांना विमानप्रवासाचा फील देणारी, अत्याधुनिक ट्रेन असून आता प्रवाशांना कोकणातील सौंदर्य न्याहाळत गोव्यात जाता येईल, अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक डी के शर्मा यांनी IBN लोकमतशी बोलताना दिली.

तेजस एक्स्प्रेसचा प्रत्येक डब्बा बनवण्यासाठी रेल्वेला 3 कोटी 25 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. याचे दरवाजे स्वयंचलित असतील. शिवाय यात सीसीटीव्ही कॅमेरा, कॉल बेल, एलईडी टीव्ही, यूएसबी चार्जिंग इत्यादी सुविधाही असतील.

ही ट्रेन आठवड्याच्या पाच दिवस धावणार आहे. ट्रेनला एकूण 7 थांबे आहेत. तेजस एक्स्प्रेस अवघ्या 8.30 तासात गोव्यातील करमाळी स्टेशनवर पोहोचेल. तर पावळ्यात कोकणातील परिस्थिती पाहता ट्रेनला करमाळीला पोहोचण्यासाठी 10.30 तास लागतील.

तेजस ट्रेनमध्ये विमानाप्रमाणे सोईसुविधा पुरवण्यात आलेल्या असून अत्याधुनिक रेल्वे प्रवासाचं स्वप्न तेजसच्या माध्यमातून पूर्ण होतं आहे. संपूर्ण ट्रेनवर खास प्रकारचं पॅटर्न छापण्यात आला आहे. तेजस ट्रेनचं भाडं शताब्दी ट्रेनच्या तुलनेत जास्त असेल...

Loading...

कशी असेल तेजस एक्सप्रेस

- तेजस एक्सप्रेस १३० किमी प्रतितास आणि त्यापेक्षा जास्त वेगानं धावणार

- मनोरंजन, वाय-फायची सुविधा असेल

- तेजस एक्सप्रेसला काचेच्या मोठ्या खिडक्यांची सुविधा

- प्रवासादरम्यान कोकणातल्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता येणार

- गाडीतल्या सीट आरामदायी आहेत

- प्रवाशांसाठी खास अल्पोपहाराची सेवा

- आयआरसीटीसीकडून ही सेवा सशुल्क देण्यात येईल.

- संध्याकाळच्या अल्पोपहारात दाबेली, डाएट चिवडा, सामोसा, कोथिंबीर वडी मिळेल

- सकाळी अल्पोपहारात ब्रेड बटरसह उपमा, पोहे, इडली, वडा मिळेल

- चहा-कॉफीसाठी मशीन्स आहेत

- सीटबरोबर एलसीडी स्क्रीन असलेली वातानुकूलित रेल्वेसेवा

'तेजस'चे भाडे :

मार्ग                                    एसी चेअर कार        ए​​​क्झिक्युटिव्ह

सीएसएमटी-रत्नागिरी             835 रु.                  1,785 रु.

सीएसएमटी-कुडाळ            1,080 रु.                   2,340 रु.

सीएसएमटी-करमाळी        1,185 रु.                    2,585 रु.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2017 08:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...