जेव्हा गुरुजीच करतात राडा!

जेव्हा गुरुजीच करतात राडा!

समाजात शिक्षकांना वेगळाच मान आहे. पण शिक्षकांनी आपली पातळी सोडून शिक्षक बँकेच्या महासभेत राडा केला.

  • Share this:

साहेबराव कोकणे, अहमदनगर, 24 सप्टेंबर : समाजात शिक्षकांना वेगळाच मान आहे. पण शिक्षकांनी आपली पातळी सोडून शिक्षक बँकेच्या महासभेत राडा केला.

हे मारामारी करणारे, धक्काबुक्की करणारे कोण गुंड नाहीयेत बरं का? हे आहेत ज्ञानदानाचे पवित्र काम करणारे गुरूजी. पण याच गुरूजींनी अहमदनगरमध्ये शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत राडा केला. या राड्यात शिक्षिका म्हणजे बाईही मागं नव्हत्या बरं का?  त्याही हाणामारीत तेवढ्याच पुढं दिसत होत्या. मग कुणीतरी पोलिसांना बोलावलं पोलीस आल्यानंतर अक्षरक्षः गुरूजींना कॉलरला धरून पुढं नेण्यात आलं.

हक्कासाठी संघर्ष करणं यात काही गैर नाही. पण स्वतःचा पवित्र पेशा विसरून खुलेआम राडा करणं गुरूजींना शोभण्यासारखं नव्हतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2017 07:58 PM IST

ताज्या बातम्या