पुण्यात 6 महिन्यांपासून शिक्षक करत होता 12 अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग

पुण्यात 12 अल्पवयीन विद्यार्थिनींचा शिक्षकानं विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 17, 2019 09:39 AM IST

पुण्यात 6 महिन्यांपासून शिक्षक करत होता 12 अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग

पुणे, अद्वैत मेहता 17 मे : पुण्यात 12 अल्पवयीन विद्यार्थिनींचा मागील 6 महिन्यांपासून शिक्षक विनयभंग करत असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हवेली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील हा प्रकार आहे. मधल्या सुट्टीत शिक्षक विद्यार्थिनींना बोलवायचा आणि त्यांचा विनयभंग करायचा. विक्रम शंकर पोतदार असं या शिक्षकाचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 8 मे रोजी हा सारा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर 15 मे रोजी शिक्षकाला अटक करण्यात आली. विक्रम शंकर पोतदार या शिक्षकाविरोधात विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात चाललंय काय?

बिअर बारचा पत्ता व्यवस्थित न सांगितल्याने तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना ताजी असताना पुण्यात गुरूवारी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. पत्ता विचारणाऱ्या तरुणीने थँक्स म्हटल्यावर एका भामट्यानं तिला जबरदस्तीने मिठी मारून तिच्या गालावर किस करून विनयभंग केला. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी ही घटना घडली. या घटनेची गंभीर दखल घेऊन लष्कर पोलिसांनी आरोपीला 24 तासांच्या आत अटक केली. राम बदरीलाल दबोडिया (वय-42) असं आरोपीचे नाव आहे.


Loading...

23 मे रोजी NDAला बहुमत मिळेल – बाबा रामदेव

काय आहे हे प्रकरण?

रस्ता चुकलेल्या पीडित तरुणीने मित्राचा पत्ता विचारणासाठी रस्त्यावर थांबलेला आरोपी राम दबोडिया याला त्याचा फोन मागितला. त्याने फोन दिली. फोन दिल्याबद्दल संबंधित मुलीने त्याला थँक्स म्हणण्यासाठी हात पुढे केला. त्यानंतर आरोपीने तरुणीचा हात धरून तिली जबरदस्तीने मिठी मारून तिच्या गालावर किस केले. या प्रकरणी पीडित तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेची गंभीर दखल घेऊन लष्कर पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपीला शोधून काढून त्याला अटक केली.


VIDEO: पश्चिम बंगालमध्ये पुन्हा राडा, भाजप नेत्यांच्या गाड्या फोडल्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2019 09:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...