शिक्षिकेची विद्यार्थिनीला अमानुष मारहाण, पाठीवर उमटले वळ

शिक्षिकेची विद्यार्थिनीला अमानुष मारहाण, पाठीवर उमटले वळ

वर्गात मुली शिकवताना लक्ष देत नाहीत या कारणावरून शिक्षिकेनेच मुलीला बेदम मारहाण केली.

  • Share this:

महेश तिवारी, वरोरा 16 जुलै : वरोऱ्यातल्या सेंट अनिस पब्लिक स्कुल मधील नर्सरीच्या एल के जी वर्गात शिकणाऱ्या  एका चार वर्षाच्या विद्यार्थिनीला शिक्षिकेने बेदम मारहाण करण्याची घटना घडलीय. गृहपाठ केला नसल्याने शिक्षिकेने चिडून जाऊन त्या मुलीला अमानुषपणे मारहाण केल्याचं स्पष्ट झालंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आलाय. ही अघोरी शिक्षा करणाऱ्या शिक्षिकेला निलंबित करा अशी मागणी करण्यात येतोय.

वरोरा शहराजवळ बोर्डा ग्रामपंचायत हद्दीतल्या द्वारका नगरी वसाहतीतील सेंट अनिस पब्लिक स्कुल आहे. सोमवार 15 जुलै रोजी सकाळी नेहमीप्रमाणे नर्सरीची मुलं शाळेत शिकत असताना  शिक्षिका वृषाली गोंडे हिने LKG B  वर्गात इंग्लिशमध्ये  अल्फाबेट पद्धत शिकवीत असताना दोन मुले बरोबर करत नसल्याने लक्षात येताच त्यांच्याकडुन अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न शिक्षिकेने केला. परंतु वर्गामध्ये त्या मुलीला अनेक वेळा सांगून सुद्धा लक्षात येत नव्हते त्यामुळे शेवटी शिक्षिकेला राग अनावर झाला  व बाजूला ठेवून असलेल्या छडीने त्या मुलीच्या पाठीवर  सपासप मारण्यास सुरुवात केली.

VIDEO : सगळे जण घरातच होते, इमारतीतून बचावलेल्या महिलेचा थरारक अनुभव

सगळी मुलं घाबरली

वेदनेने मुलगी किंचाळत होती हे दृश्य पाहून बाकी सगळे मुले स्तब्ध राहून निमुटपणे हा प्रकार  पहात होते. त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शाळेला सुट्टी झाल्या नंतर  झालेला हा सगळा प्रकार मुलीने आपल्या आई-वडिलांना सांगितला तसेच मारहाणीच्या वेदनेमुळे  मुलगी आजारी पडली.  आपल्या मुलीला काहीच न आल्याने शिक्षिकेने मारले असावे असे पालकांना वाटले परंतु जेव्हा तिच्या पाठीवरचे उमटलेले वळ दिसले ते पाहून पालकांना धक्का बसला.

VIDEO: जीवघेणी कसरत! दोरीवरून पार करावी लागते नदी

शिक्षिकेला निलंबित करा

हा सगळा प्रकार त्यांनी परिचितांना सांगितला. या सगळ्या घटनेची माहिती घेण्यासाठी पालक आज  शाळेमध्ये पोहोचले असता शिक्षिकेने रडक्या स्वरात झालेल्या प्रकाराची माफी मागितली. आपल्या मुलीला याच शाळेत पुढील शिक्षण घ्यायचे आहे त्यामुळे शिक्षिकेशी व संस्थेशी पंगा नको या विचाराने पालकांनी देखील नंतर नमते घेतले. परंतु आमची मुलगी त्या शिक्षिकेच्या हाताखाली शिकणार नाही तिला वर्ग बदलून हवा ही अट घालून त्यांनी माघार घेतली.

ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने इतर पालकांमध्ये शाळेतील शिक्षिके बद्दल असंतोष निर्माण झाला आहे. चोहो बाजूने या घटनेचा निषेध होत असून संबंधित शिक्षिकेला तत्काळ निलंबित करण्याची मागणी जोर धरू लागलीय.

VIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी

वरोरा शहरांमधील सेंट अनिस ही संस्था नामांकित असून या शाळेत  मुलांना प्रवेश मिळविण्यासाठी स्पर्धा असते. अशा शाळेतल्या  शिक्षिका जर अशा प्रकार वागत असतील तर मुलांचं काय होणार असा प्रश्न आता विचरला जातोय. शाळा प्रशासनानेही अशा घटनांबद्दल शिक्षिकेविरुद्ध कडक करवाई करावी अशी मागणी पालकांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 16, 2019 06:56 PM IST

ताज्या बातम्या