10 लाखांची लाच स्वीकारताना तहसीलदाराला ठाण्यात अटक

10 लाखांची लाच स्वीकारताना तहसीलदाराला ठाण्यात अटक

काश्मीरा गावातील जमीन सर्व्हे क्रमांक-५६ आणि ५९ या जमिनीला एनए करून ऑर्डर घेण्यासाठी आलेल्या तक्रारदार यांच्याकडून १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. सदर मागणी प्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत खात्याकडे तक्रार केली. मंगळवारी रात्री किसन भदाणे आणि राम उगले यांना लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत खात्याच्या पथकाने रंगेहात अटक केली.

  • Share this:

ठाणे,17 ऑक्टोबर: ठाण्याचे तहसीलदार किसन भदाणे याला 10 लाखाची लाच मागितल्या प्रकरणी एसीबीने अटक केली आहे.त्यांना एसीबीने दहा लाख रूपयांसह अटक केल्याची माहिती मिळत असून सध्या एसीबीची कारवाई सुरू आहे.

जमीन एनए ऑर्डर देण्यासाठी १० लाखाची लाचेची मागणी संबंधित तहसीलदाराने केली होती. ती लाच घेताना ठाण्याचा तहसीलदार किसन भदाणे आणि राम उगले यांना लाचलुचपत खात्याच्या पथकाने अटक केली. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काश्मीरा गावातील जमीन सर्व्हे क्रमांक-५६ आणि ५९ या जमिनीला एनए करून ऑर्डर घेण्यासाठी आलेल्या तक्रारदार यांच्याकडून १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. सदर मागणी प्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत खात्याकडे तक्रार केली. मंगळवारी रात्री किसन भदाणे आणि राम उगले यांना लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत खात्याच्या पथकाने रंगेहात अटक केली. ठाण्याच्या रुस्तमजी बिल्डरच्या इमारतीत भदाणे याच्या मालकीचा संपूर्ण फ्लोअर असल्याची माहिती समोर येत आहे. याची किंमत ५ कोटी रुपये आहे. तर भदाणे याच्या मालकीची अनेक दुकाने इतर ठिकाणी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लाचलुचपत खात्याच्या पथकामार्फत त्यांच्या घराची तपासणी सुरु आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यात भदाणे आणि त्यांचा सहकारी उगले यांच्यावर रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती लाचलुचपत विभागाच्या अधिकारी यांनी दिली.

ठाण्याच्या तहसीलदारासोबत एका खासगी इसमाला देखील अटक करण्यात आली आहे. सध्या एसीबी तहसीलदाराच्या घराची झडती घेत असून मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त होऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2017 10:25 PM IST

ताज्या बातम्या