ताडोबाची सफर महागली; सर्वसामान्यांना अशक्यच!

ताडोबाची सफर महागली; सर्वसामान्यांना अशक्यच!

पूर्वी 700 ते 1000 असणारं प्रवेश शुल्क आता विकेंडला शनिवारी आणि रविवारी 8 हजार रुपये करण्यात आलं आहे. तर इतर दिवशी 4 हजार रुपये एवढं शुल्क ठेवण्यात आलं आहे.

  • Share this:

09 जानेवारी : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटन करणं आता सर्वसामान्यांसाठी एक स्वप्नच राहणार आहे. कारण वनविभागानं ताडोब्यातील प्रवेश शुल्कात मोठी वाढ केली आहे. पूर्वी 700 ते 1000 असणारं प्रवेश शुल्क आता विकेंडला शनिवारी आणि रविवारी 8 हजार रुपये करण्यात आलं आहे. तर इतर दिवशी 4 हजार रुपये एवढं शुल्क ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना हे दर परवडणारे नाहीत. या दर वाढीमुळे पर्यटकांच्या संख्येत घट होण्याचीही शक्यता आहे.

या व्याघ्र प्रकल्पात जिप्सिचे चार्जेस 2200 रुपये आहे आणि गाईडचे 300 रुपये म्हणजेच काय तर विकेंडला ताडोबात व्याघ्र दर्शनासाठी 10,500 रुपये लागतील. तर 120 दिवस आधीच आनलाईन बुकिंग करण्याची सोयही सुरु करण्यात आली आहे. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवेश शुल्कात वाढ केल्याने सर्वसामान्यांनी पर्यंटनासाठी येऊच नये का असा सवालही व्याघ्रप्रेमींकडून विचारण्यात येतो आहे.

आधी हेच शुल्क 700 ते 1000 रुपये एवढेच होते. ​पण त्यात आता अशा पद्धतीने दरवाढ करण्यात आली आहे.

ताडोबातील नवे प्रवेश शुल्क

- सोम ते शुक्रवार - 4 हजार रुपये

- शनिवार आणि रविवार - 8 हजार रुपये

- जिप्सी चार्जेस - 2200

- गाईड 300

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2018 10:24 AM IST

ताज्या बातम्या