फडणवीसांच्या मंत्र्यावर ताशेरे, अधिवेशनाआधी भाजपच्या अडचणी वाढल्या

फडणवीसांच्या मंत्र्यावर ताशेरे, अधिवेशनाआधी भाजपच्या अडचणी वाढल्या

ताडदेव मिल कंपाऊंडमध्ये एसआरएला परवानगी देताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा प्रकाश मेहता यांच्याकडून मारण्यात आला होता.

  • Share this:

मुंबई, 6 जून : ताडदेव मिल कंपाऊंड एसआरए घोटाळ्याप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर लोकायुक्तांनी ताशेरे ओढले आहेत. प्रकाश मेहता यांनी याप्रकरणी मदत केल्याचं निरीक्षण लोकायुक्तांनी नोंदवलं आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ताडदेव मिल कंपाऊंडमध्ये एसआरएला परवानगी देताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा प्रकाश मेहता यांच्याकडून मारण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्र्यांना अवगत करण्यात आलं नसल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणाच्या सुनावणीत अनेक साक्षी तपासल्या गेल्या. त्यानंतर प्रकाश मेहता यांच्यावर लोकायुक्तांकडून ताशेरे ओढण्यात आले आहेत.

विरोधकांचा हल्लाबोल, सरकारच्या अडचणीत भर

ताडदेवमधील मिल कंपाऊंड प्रकरणी लोकायुक्तांनी ओढलेल्या ताशेऱ्यांनंतर प्रकाश महेता यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'मंत्र्यांनी आता जनाची नाही तर मनाची लाज ठेवावी,' असा घणाघातही धनंजय मुंडे यांनी केला आहे.


खुशखबर! येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2019 01:17 PM IST

ताज्या बातम्या