राज्य अडकलंय स्वाईन फ्लूच्या विळख्यात

या आजारानं आतापर्यंत राज्यात 263 रुग्ण दगावलेत. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागापुढं स्थिती नियंत्रणात आणण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2017 11:14 AM IST

राज्य अडकलंय स्वाईन फ्लूच्या विळख्यात

2 जुलै : राज्यात स्वाईन फ्लूनं पुन्हा डोकं वर काढलंय. यावर्षी या आजारानं आतापर्यंत राज्यात 263 रुग्ण दगावलेत. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागापुढं स्थिती नियंत्रणात आणण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय.

दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सक्रिय होणारा स्वाईन फ्लूचा वायरस यावर्षी पावसाळा सुरू होतानाच अधिक आक्रमक झालाय. यावर्षी जानेवारी 2017 पासून 29 जून 2017 पर्यंत राज्यात 263 रुग्णांचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झालाय. मुंबईमध्ये 12 तर ठाण्यात 9 जण दगावलेत. पुण्यात सर्वाधिक 62 जणांचा मृत्यू झालाय. या आजारानं ग्रस्त 1720 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. राज्यात आतापर्यंत 7581 संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आलीय. या आजाराने निर्माण केलेलं आव्हान पाहता राज्य सरकारने खाजगी रुग्णालये आणि दवाखान्यांतील संशयित रुग्णांवर थेट उपचार करण्याचे आदेश दिलेत. या आजारावरील औषध म्हणून वापरल्या जाणाऱ्या टॅमी फ्लूचा पुरेसा साठा असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिलीय.राज्यात 2013मध्ये स्वाइन फ्लूने 149 रुग्ण दगावले होते, 2014साली 46, 2015ला 905 तर 2016ला 26 रुग्ण मरण पावले होते.

मुंबईसह राज्यात स्वाईन फ्लू आणि इतर साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यात पुरेसं यश मिळत नसल्यानं केंद्रीय पथकानं नुकतीच मुंबईला भेट दिलीय. त्यानंतर राज्याचा आणि मुंबई पालिकेचा आरोग्य विभाग तत्परतेने कामाला लागलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2017 10:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...