भरधाव वेगात मुंबईहून जाणाऱ्या स्विफ्ट कारचा भीषण अपघात, 3 जण जागीच ठार

देहुरोड येथील सेंटोसा हॉटेलसमोर हा अपघात झाला. अपघात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2019 11:42 AM IST

भरधाव वेगात मुंबईहून जाणाऱ्या स्विफ्ट कारचा भीषण अपघात, 3 जण जागीच ठार

मुंबई, 07 जुलै : मुंबई-बंगळुरू हायवेवर भीषण अपघात झाला आहे. स्विफ्ट कार आणइ ट्रकची धडक झाल्यामुळ तिघांचा मृत्यू झाला असून या अपघातामध्ये एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. पावसाळ्यात रस्ते ओले असल्यामुळे गाडीवरचा ताबा सुटून अपघात झाल्याच्या अनेक घटना आपण सगळ्यांनी पाहिल्या आहेत. पण तरीदेखील गाड्यांचा वेग काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे नाहक जीव जाण्याची वेळ येते.

मुंबई-बंगळुरू हायवेवर 6 वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जाणारी स्विफ्ट (एम एच 12 EM 7944)  या भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला (GJ 31 T2614 ) मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. देहुरोड येथील सेंटोसा हॉटेलसमोर हा अपघात झाला. अपघात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यावर नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पराग हरेगावकर, राजेंद्र मांजरे, अभिषेक शर्मा, अशी अपघातीत मृतांची नावं आहेत. कारची धडक एवढी जोरदार होती की या तिघांचेही मृतदेह छिन्न-विछीन्न  अवस्थेत कारमध्ये आढळून आले. या अपघातात जखमी असलेल्या एकाला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

पावसामुळे मुंबईत भीषण अपघात; ट्रक, कारच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू 5 जखमी

मुंबईच्या जोगेश्वरी फ्लायओव्हरवर शनिवारी सकाळी एक भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली होती. ट्रक आणि कारमध्ये हा भीषण अपघात झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. जोगेश्वरी ईस्टमध्ये ट्रोमा रुग्णालयासमोर असलेल्या फ्लायओव्हरवर हा अपघात झाला. घटनास्थळी दाखल पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.

Loading...

चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचा वेग जास्त होता त्यात मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. अशात गाडीवरचा ताबा सुटल्याने अपघात झाला. ट्रकचा वेग जास्त असल्याने त्याला वेळीच ब्रेक मारता आला नाही आणि त्यामुळे ट्रक कारवर जाऊन आदळला. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर कारचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 11:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...