S M L

स्विफ्ट कार आणि कंटेनरचा अपघात, बहिणीसमोर भावाने गमावला जीव

बेळगावमध्ये स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. बुधवारी संध्याकाळी कुमठा तालुक्यात मादनगेरी इथेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वर हा अपघात झाला. या अपघातात पती-पत्नीला आपला जीव गमवावा लागला आहे तर एक महिला जखमी झाली आहे.

Updated On: Oct 11, 2018 12:31 PM IST

स्विफ्ट कार आणि कंटेनरचा अपघात, बहिणीसमोर भावाने गमावला जीव

बेळगाव, 11 ऑक्टोबर : बेळगावमध्ये स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. बुधवारी संध्याकाळी कुमठा तालुक्यात मादनगेरी इथल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वर हा अपघात झाला. या अपघातात पती-पत्नीला आपला जीव गमवावा लागला आहे तर एक महिला जखमी झाली आहे.

सुरेश रायकर वय 65,  चंद्रकला रायकर वय 60 अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. भारती वेर्णेकर असं जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. जखमी महिला या सुरेश रायकर यांच्या बहीण आहेत. आपल्या भावाचा डोळ्यासमोर मृत्यू झाल्याने भारती यांना मोठा धक्का बसला आहे.

कामानिमित्त हे तिघेही जण स्विफ्ट कारने प्रवास करत होते. त्यावेळी सकाळच्या सुमारास समोरून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यात गाडीचा चक्काचूर झाला आहे तर सुरेश आणि त्यांच्या पत्नी चंद्रकला यांचा जागीच मृत्यू झाला आहे.सुरेश यांच्या भगिनी भारती या अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत. त्यांच्यावर जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची अकोला पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी दोन्ही  मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत,  तर नेमका हा अपघात कसा झाला आणि यात कोणाची चूक होती याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

तपासणीसाठी थांबवले म्हणून वाहतूक पोलिसांना मारहाण, मारहाणीचा VIDEO व्हायरल

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2018 12:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close