News18 Lokmat

काँग्रेसच्या स्वाती येवलुजे कोल्हापूरच्या नव्या महापौर; शिवसेनेनेही दिला पाठिंबा

कोल्हापूरमध्ये शिवसेना भाजपच्या विरोधात गेली आहे. हात वर करून यावेळी मतदान पार पडले आहेत. स्वाती येवलुजे कोल्हापूरच्या 45व्या महापौर ठरल्या आहेत

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 22, 2017 12:17 PM IST

काँग्रेसच्या स्वाती येवलुजे कोल्हापूरच्या नव्या महापौर; शिवसेनेनेही दिला पाठिंबा

कोल्हापूर, 22 डिसेंबर:  कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या स्वाती येवलुजे यांची निवड झाली आहे. शिवसेनेने काँग्रेस आघाडीला यावेळी मतदान केलं असून पहिल्यांदाच शिवसेना मतदान प्रक्रियेत सहभागी झाली आहे.

उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे सुनील पाटील यांची निवड झाली आहे. यावेळी शिवसेनेची सगळी मते काँग्रेस आघाडीला पडली आहेत. तब्बल 48 मतांनी महापौर आणि उपमहापौर विजयी झाले आहेत. कोल्हापूरमध्ये शिवसेना भाजपच्या  विरोधात गेली आहे. हात वर करून यावेळी  मतदान  पार पडले आहेत.  स्वाती येवलुजे कोल्हापूरच्या  45व्या महापौर ठरल्या आहेत

दरम्यान एक नजर टाकूयात कोल्हापूर महापालिकेतल्या पक्षीय बलाबलावर..

कोल्हापूरचे पक्षीय बलाबल  

एकूण नगरसेवकांची संख्या - 81

Loading...

काँग्रेस - 29

राष्ट्रवादी काँग्रेस - 15

भाजप - 14

ताराराणी आघाडी - 19

शिवसेना - 4.

या आकड्यांनुसार काँग्रेस आघाडीकडं 44 नगरसेवक आहेत. तर भाजप ताराराणी आघाडीकडं 33 नगरसेवक आहेत. त्यामुळं आता शिवसेना याबाबत कुणाला मतदान करणार याची चर्चा सध्या कोल्हापूरमध्ये आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 22, 2017 12:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...