मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर गाडीची शर्यत बेतली जीवावर; ठाण्यातल्या स्वधा दुबेसह तिघांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर लावलेल्या शर्यतीवेळी खालापूरमध्ये झालेल्या अपघातात ठाण्यातल्या स्वधा दुबे नावाच्या तरुणीसह तिघांचा मृत्यू झाला आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 10, 2018 08:55 AM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर गाडीची शर्यत बेतली जीवावर; ठाण्यातल्या स्वधा दुबेसह तिघांचा मृत्यू

10 जानेवारी : वेगात गाडी चालवण्याच्या नादात ठाण्यातल्या तीन तरुणांचा बळी घेतला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर लावलेल्या शर्यतीवेळी खालापूरमध्ये झालेल्या अपघातात ठाण्यातल्या स्वधा दुबे नावाच्या तरुणीसह तिघांचा मृत्यू झाला आहे. स्वधा दुबे ठाण्यातील ब्रम्हांड सोसायटीची रहिवासी होती. फॅशन डिझायनिंगची विद्यार्थीनी स्वधा आपल्या एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्याला गेली होती. एकुण दहा मित्र मैत्रिणी दोन गाड्या घेऊन लोणावळ्याला गेले होते. आणि परत येत असतानाच त्यांच्या गाडीचा अपघात झाला.

लोणावळा येथून परत येत असताना खालापूरजवळ दोन्ही गाड्यांमध्ये शर्यत सुरू झाली. या शर्यतीने तिघांचा घात केला. खालापूरजवळ डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगात असलेली पोलो गाडी समोरच्या दुसर्‍या गाडीवर आदळली आणि स्वधासोबत तिच्या इतर दोन मित्रांचा जीव घेला. पोलो गाडीत एकूण पाच लोक होते. स्वधाच्या गाडीतले दोन मित्र अजूनही गंभीर अवस्थेत आहेत.

काल रात्री लोणावळ्याला जाण्यासाठी परवानगी मिळाल्यानं स्वधा खूप आनंदी होती पण आज मात्र आता ती स्वतःच या जगात नाही. स्वधाचा अपघात झाला त्यावेळी दुसऱ्या गाडीतले मित्र घाबरून गेले. त्यांनी आपापले मोबाईल रस्त्यावरच फोडले. जवळून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी या मित्रांना सावरले आणि किमान जे काही झालंय ते घरी कळवा असं म्हणत सर्वांना धीरही दिला.

वेगाणं गाडी चालवणं हे सध्याच्या मुलांमध्ये एक व्यसनच झालं आहे पण मित्रांनो व्यसनं गंभीर असतात आणि त्याच्या सेवनानं असे घात होतात. त्यामुळे वेगानं गाडी चालवताना एकदातरी आपल्या मौल्यवान जीवाचा विचार करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2018 08:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...