S M L

‘स्वाभिमानी’चे दूध आंदोलन पेटले; टँकर जाळण्याचा प्रयत्न!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु होण्याआधीच पेटले आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी वरुडवरुन नागपुरला जाणारा दुधाचा टँकर फोडला आणि पेटविण्याचाही प्रयत्न केला.

Updated On: Jul 15, 2018 06:32 PM IST

‘स्वाभिमानी’चे दूध आंदोलन पेटले; टँकर जाळण्याचा प्रयत्न!

अमरावती, ता. 15 जुलै : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु होण्याआधीच पेटले आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी वरुडवरुन नागपुरला जाणारा दुधाचा टँकर फोडला. दूध दरावाढीच्या मुद्यावर आक्रमक झालेल्या या कार्यकर्त्यांनी नंतर त्या टँकरचे टायरही जाळण्याचा प्रयत्न केला. आंदोलनाचे मुख्य कारण म्हणजे, गाईच्या दुधाला आणि दूध पावडरला अनुदान द्यावे अशा मागणी, गोकुळने सर्वातआधी केली होती. यासाठी जिल्हाधिकारी कार्यावर मोर्चाही काढण्यात आला होता. मात्र त्यावर कोणताच निर्णय न झाल्यामुळे गोकुळने एक दिवस संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शिवाय या आंदोलनामुळे राज्य सरकारने संघटनेची मागणी मान्य केली तर त्याचा फायदा दूध उत्पादकांना होणार असल्यामुळे नुकसान सहन करुनही गोकुळने एक दिवस दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 7 जण जागीच ठार

अन्नदान करायला आलेल्या महिलेचा मुलांसमोरच मृत्यू

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवार 16 जुलै रोजी एक दिवस दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राजु शेट्टी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत, जिल्हा दूध उत्पादक संघाने सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात गोकुळ दूध संकलित करणार नाही असा पवित्रा घेतला आहे. याच मुद्यावरुन आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी वरुडवरुन नागपुरला जाणाऱ्या दुधाचा टँकर फोडला. नंतर त्या कार्यकर्त्यांनी ट्रकचे टायरही पेटविण्याचा प्रयत्न केला. स्वाभिमानीने पुकारलेल्या या आंदोलनामुळे राज्यात दुधाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. गोकुळला एक दिवसाचे सुमारे पाच कोटींचे नुकसान होणार असूनही त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, शव कटरनं कापून बाहेर काढण्याचा प्रयत्न

Loading...
Loading...

'5 बळी गेले पण 5 लाख लोक घरी सुरक्षित तर जातात ना,' चंद्रकांत पाटील यांचं अजब विधान

कोल्हापुरात कार्यकर्त्यांची धरपकड

तर, कोल्हापुरात  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झालीय.  दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही  कारवाई सुरू केलीय. उद्यापासून स्वाभिमानीचे दूध दर आंदोलन सुरू होणार आहे. सरकारकडून दूध आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेनं केला आहे.  कोल्हापूर पोलिसांनी आतापर्यंत 25 हून अधिक कार्यकर्त्यांना  ताब्यात  घेतले आहे.

कोल्हापुरात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

मराठवाडा दौऱ्यातून होणार नव्या ठाकरेंची एण्ट्री; मनसेचा असेल हा मास्टर प्लॅन

एकट्या मुंबईला होतो सात लाख लीटर दूध पुरवठा

एकट्या मुंबईला गोकुळकडून सात लाख लीटर दूध पुरवठा केला जातो. राज्य सरकारने गाईच्या दुधाला प्रतिलिटर 5 रुपयांची दरवाढ करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. संघटनेकडून आता मुंबईला जाणारे दूध रोखण्याची घोषणा करण्यात आली आहे. एक दिवस संकलन बंद केल्यामुळे गोकुळला सुमारे 5 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 15, 2018 06:11 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close