स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारख्या बांडगुळांना मी घाबरणार नाही - सदाभाऊ खोत

स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कारवर गाजरं फेकल्याची घटना समोर आली आहे. त्यावर सदाभाऊंनी स्वाभिमानी संघटनांवर टीका केली आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Feb 24, 2018 03:07 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारख्या बांडगुळांना मी घाबरणार नाही - सदाभाऊ खोत

24 फेब्रुवारी : स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कारवर गाजरं फेकल्याची घटना समोर आली आहे. कुर्डूवाडीजवळील रिधोर गावाजवळ ही घटना घडली आहे. पण माझ्यावर व्यक्तिद्वेषातून हल्ला करण्यात आला असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारख्या बंडगुळांना मी घाबरणार नाही असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानींवर टीका केली आहे.

पाया खालची वाळू सरखल्याने माझ्या गाडीवर हल्ला केला आहे असं खोत म्हणाले. अशा प्रकारच्या कोणत्याही हल्ल्याला मी घाबरणार नाही.

मी हल्ल्याचा धिक्कार करतो. अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

दिवसेंदिवस शेतकर्‍यांच्या समस्येत वाढ होत असताना, राज्यातील शेतकरी कर्जाला कंटाळून आत्‍महत्या करत असल्याच्या विविध कारणांमुळे संतापलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला आहे.

पंढरपूरहून बार्शीकडे जाताना ही घटना घडली. पण दरम्यान स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2018 02:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...