स्वाभिमानी संघटनेला खिंडार..दीड डझन पदाधिकाऱ्यांचा रयतक्रांती संघटनेत प्रवेश

स्वाभिमानी संघटनेला खिंडार..दीड डझन पदाधिकाऱ्यांचा रयतक्रांती संघटनेत प्रवेश

माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेला मोठे खिंडार पडले आहे.

  • Share this:

मुंबई, 27 जून- माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेला मोठे खिंडार पडले आहे. स्वाभिमानीच्या तब्बल दीड डझन पदाधिकाऱ्यांनी रयत क्रांती संघटनेमध्ये प्रवेश केला आहे. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या सदस्यांचा देखील समावेश आहे. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या 'रयतक्रांती संघटने'मध्ये प्रवेश केला. यामध्ये राज्य कार्यकारिणीचे सदस्य, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा संघटक, तालुका अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष यांचा समावेश आहे. स्वाभिमानीतील अंतर्गत दबाव, जातीयवाद अशा गोष्टींना कंटाळून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. यात जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा संघटक, तालुका अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष तसेच सदस्यांचा समावेश आहे.

राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक पगार, जिल्हा उपाध्यक्ष डोंगर आण्णा पवार, जिल्हा संघटक भिकाबापु धोंडगे, जिल्हा संघटक केरादादा पगार, जिल्हा संघटक साहेबराव पाटील (अहिरे), जिल्हा संघटक संदीप कापडणीस, जिल्हा संघटक रवींद्र पगार, कळवण तालुका अध्यक्ष रामकृष्ण जाधव, सटाणा तालुका अध्यक्ष सुभाष अहिरे, देवळा तालुका अध्यक्ष रवींद्र शेवाळे, युवा उपाध्यक्ष पंडूरिनाथ अहिरे, तालुका युवा उपाध्यक्ष भाऊसाहेब पगार. तालुका युवा अध्यक्ष युवराज देवरे, तालुका उपाध्यक्ष दादाजी पगार, तालुका युवा उपाध्यक्ष विरेंद्र पगार, तालुका युवा उपाध्यक्ष चंद्रकांत पवार, तालुका युवा उपाध्यक्ष युवराज पगार या सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रयतक्रांती संघटनेमध्ये प्रवेश केला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, नाशिक जिल्हाध्यक्ष विशाल पवार, कार्यकारणी सदस्य अजय बागल हे उपस्थित होते.

VIDEO:आजचा दिवस हा मराठा समाजासाठी ऐतिहासिक दिवस- संभाजी राजे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2019 10:15 PM IST

ताज्या बातम्या