त्या पोलिसानेच आखला कोट्यवधींच्या लुटीचा डाव, पण...

त्या पोलिसानेच आखला कोट्यवधींच्या लुटीचा डाव, पण...

पोलीस असल्याचा बनाव करून साखर कारखान्याच्या संचालकाकडून साडे चार कोटी रूपये लुटण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला.

  • Share this:

तुषार तपासे, कराड,ता.20 जून : पोलीस असल्याचा बनाव करून साखर कारखान्याच्या संचालकाकडून साडे चार कोटी रूपये लुटण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला. विजापूर येथील साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकासह अन्य तिघांना बेदम मारहाण करून सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या रोख रकमेसह निवृत्त पोलीस उपअधीक्षक आणि अन्य एकाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

कराड जवळ दुपारी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गोटे येथे हा प्रकार घडला. या दरोड्या तील चार आरोपींना जेरबंद करण्यात कराड आणि रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातले 4 कोटी 48 लाख रूपयांची रक्कम आणि अपहरण केलेल्या व्यक्ती ना सोडवण्यात यश आले आहे.

या प्रकरणातील धक्कादायक बाब ही की या चार आरोपी मध्ये ठाणे पोलीस ठाण्यातील गजानन तदडीकर हा निलंबित पोलीस कर्मचारी सामील होता. या आधी सुद्धा या टोळीने पोलीस असल्याचे भासवून अनेक गुन्हे केल्याचा समोर आले आहे

 दोघेही मिळून मुख्यमंत्री ठरवू,चंद्रकांत पाटलांकडून युतीचं बोला

 शरद पवारांचा 'खास' निरोप घेऊन जितेंद्र आव्हाड राज ठाकरेंच्या भेटीला!

कारखान्याच्या 225 कोटीच्या कर्ज प्रकरणासाठी कमिशन म्हणून 4 कोटी 50 लाख ही रक्कम पुण्याकडे घेऊन जात असताना कराड शहरा जवळ हॉटेल महेंद्र येथे सिने स्टाईल हा दरोडा टाकण्यात आला. या प्रकारामुळे कराड शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून राज्यभर तपास चक्रे फिरवत रत्नागिरी जिल्ह्यात रोख रकमेसह काही संशयितांना अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले. 1)गजानन तदडीकर 2)विकास कुमार मिश्रा 3)महेश भांडारकर 4) दिलीप म्हात्रे अशी ताब्यात घेतल्याची नावे आहेत.

VIDEO :'शिशिर शिंदेंच्या 'घरवापसी'मुळे राज ठाकरे दुखावले'

VIDEO : कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, शरद पवार ट्रॅफिकमध्ये अडकले

नेमकं काय घडलं...

कर्नाटकमधील हिरेबेन्नूर ता. इंडी,जि. विजापूर येथील ज्ञानयोगी स्वामी शिवकुमारजी शुगर कारखान्यास ठाणे येथील किंग फायनान्स कंपनीने सुमारे 225 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारस कराड येथील हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह येथे कारखान्याचे कार्यकारी संचालक सुधीर बिरादार, सुभाष पाटील, दिलीप म्हात्रे, मोहन भाई व निवृत्ती पोलीस उपअधिक्षक चौकीमट आले होते.

दरम्यान, हॉटेलमधून कराडकडे येत असताना उपमार्गावर गोटे ता. कराडनजीक दोन इनोव्हा कार त्यांच्या गाडीच्या आडव्याआल्या. आठ ते दहा लोक या दोन्ही इनोव्हा कारमधून उतरले. त्यांनी कारखान्याच्या पदाधिकार्‍यांना आणि त्यांच्या सोबत असणार्‍या लोकांना गाडीतून खाली उतरवून आम्ही पोलीस आहोत, तुम्ही क्राईम ब्रँचला चला, असे म्हणत काठीने मारहाण केली.

शनी शिंगणापूरच्या ट्रस्टवर राज्य सरकार पहारे'दार'

औरंगाबादनंतर सोलापुरात अफवेमुळे दोघांना बेदम मारहाण

त्यानंतर दमदाटी करून त्यांच्याकडील सुमारे साडे चार कोटी रुपयांची रोकड असणार्‍या बॅगा जबरदस्तीने हिसकावून घेवून चौकीमट आणि अन्य एकास गाडीत घालून हल्लेखोर चिपळूणच्या दिशेने पसार झाले.

त्यानंतर कारखान्याचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रमोद जाधव यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन तात्काळ सूत्रे हालविली. पोलिसांनी राज्यभर नाकाबंदी करत संशयितांना ताब्यात घेतलं. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी या टोळीने चार गाड्यांचा वापर केला होता.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2018 08:07 PM IST

ताज्या बातम्या