नाशिक कारागृहात कैद्याकडे सापडली संशयास्पद वस्तू !

नाशिक कारागृहात कैद्याकडे सापडली संशयास्पद वस्तू !

एवढंच नाहीतर कैद्याकडे रोख 30 हजार आणि मोबाईलही सापडला आहे.

  • Share this:

28 फेब्रुवारी : नाशिक जिल्हा कारागृहातील साने गुरुजी यार्ड मधील कैद्याकडे संशयास्पद इलेक्ट्रीक वायर सापडल्यानं खळबळ माजली आहे. एवढंच नाहीतर कैद्याकडे रोख 30 हजार आणि मोबाईलही सापडला आहे.

मुस्तफा मकसुद अली खान असं या कैद्याचं नाव असून साने गुरुजी यार्डातील सुधारवाणी केंद्रात चक्क ही वायर चिकटपटीनं चिकटवून ठेवली होती. दरम्यान कारागृह अधीक्षकांनी कैद्याला नोटीस  बजावली असून याच कैद्याकडे मोबाईल आणि 30 हजाराची रोकड सापडल्याची माहिती समोर आलीय.

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याऐवजी नोटीस बजावल्यानं, कारागृह प्रशासन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतंय की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, या कारागृहातील कर्मचारी अनील बुरकुल याने अधिक्षक राजकुमार साळी यांच्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचं समजतंय. कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप या तक्रार अर्जात केले असून साळी यांच्या बदलीची मागणी केल्याची सूत्रांकडून माहिती समजतंय.

या प्रकरणी तुरुंग महानिरीक्षकांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याने कारागृहाची आता पुन्हा एकदा तपासणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2018 10:39 PM IST

ताज्या बातम्या