प्रकाश आंबेडकरांनी डॉ. बाबासाहेबांच्या 'सेक्युलॅरिझम'चा खून केला- सुशीलकुमार शिंदे

प्रकाश आंबेडकरांनी डॉ. बाबासाहेबांच्या सेक्युलॅरिझमचा खून केलाय. जात-पात न मानणारे सीपीएम त्यांच्यासोबत गेलेत. भाजपने उभे केलेले पिल्लू असून सर्वधर्मसमभावाचे वोट कटवा आहेत. मतांच्या विभागणीसाठी वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर उभे आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 16, 2019 07:14 PM IST

प्रकाश आंबेडकरांनी डॉ. बाबासाहेबांच्या 'सेक्युलॅरिझम'चा खून केला- सुशीलकुमार शिंदे

सोलापूर, १६ एप्रिल- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीच्या माध्यमातून एमआयएम या कट्टर जातीयवादी पक्षाबरोबर गेलेत. प्रकाश आंबेडकरांनी डॉ. बाबासाहेबांच्या सेक्युलॅरिझमचा खून केलाय. जात-पात न मानणारे सीपीएम त्यांच्यासोबत गेलेत. भाजपने उभे केलेले पिल्लू असून सर्वधर्मसमभावाचे वोट कटवा आहेत. मतांच्या विभागणीसाठी वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर उभे आहेत.

ही माझी शेवटची निवडणूक

एखाद्या दलित कार्यकर्त्याने सर्वसाधारण जागेवर निवडून येणे ही मोठी कठीण गोष्ट पण सोलापूरकरांनी जगाला दाखवले की, आमचा जिल्हा हा सर्वधर्म समभावाचा जिल्हा आहे. इथे जाती धर्माच्या नावावर काही चालत नाही. एखाद-दुसरावेळी चालले पण बहुतेकवेळा चालले नाही.यापुढे कोणत्याही निवडणुकीत उभा राहणार नाही. ही माझी शेवटची निवडणूक आहे. दुसरीकडे, भाजपच्या वाटचालीत नसलेल्या उमेदवाराला धर्माच्या नावावर त्यांना उमेदवारी दिली. भाजपने आपला हेतू पूर्ण करण्यासाठी त्यांचा बळी देण्याचा प्रयत्न केलाय.

१९७४ पासून निवडणुका लढवत आलोय. सोलापूर जिल्हा हा एकच माझा मतदारसंघ राहिलेला आहे. मी कधीही जिल्हा सोडला नाही. त्यामुळे जिल्ह्याचा आभारी आहे. १९७४ पासून २०१४ चा अपवाद वगळता आजपर्यंत सर्व निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून दिले.

१९९८-९९ मध्ये दोन्ही वेळी सर्वसाधारण जागेवरुन निवडून दिले. दोन वेळा दक्षिण सोलापूर तालुक्यातून २००३ आणि २००४ या दोन्ही वेळी आमदारकीला निवडून दिले. हा लोकशाहीचा गौरव समजतो, असंही सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं. मी तीन ते चार वेळेस भाजपचे खासदार निवडून आले. भाजपच्या खासदारांनी एक तरी प्रकल्प सोलापुरात आणलाय का? टीका करणे फार सोपे मात्र कष्ट करुन प्रोजेक्ट आणणे सोपे नसते. मतदारांना विनंती करतोय की, मी नेहमी विकासाचा अजेंडा घेऊन आलोपण आज भाजपकडे विकासाचा अजेंडा नाहीय. त्यामुळेच दुसऱ्या गोष्टी काढून टीका करत आहेत. मोदींनी ५ वर्षात सोलापुरातील टेक्सटाइलमधून एक मिटर तरी कपडा खरेदी केलात का? असा सवाल सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.

Loading...

नितीन गडकरींना धड चालता येत नाही

सुशीलकुमार शिंदे यांनी नितीन गडकरी यांचाही चांगलाच समाचार घेतला. गडकरींना धड चालता येत नाही. त्यांना नीट उभारता येत नाही. त्यांनी माझावर टीक करणे ही त्यांची संस्कृती आहे. त्यांची संस्कृती त्यांना लखलाभ आहे. कॉंग्रेसचा ईव्हीएम विरोध कायम आहे. तीन राज्यात जिंकलो याचा अर्थ आमचा विरोध मावळला असे नाही.

सोलापूरचे जुने विमानतळ दुसरीकडे नेणार आणि त्याठिकाणी आयटी पार्क सुरू करणार, ही भाजपची धमकीची भाषा आहे.

राज ठाकरे यांनी वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे आता देशात घडत आहे. पुलवामातील कमांडर इन चीफने सरकारकडे मागणी केली होती की, तेथील रस्ते ठीक नाहीत. आम्हाला विमानाचे तिकिटे द्यावीत, असा गौप्यस्फोट सुशीलकुमार शिंदे यांनी केला.


VIDEO: रितेश देशमुखही प्रचाराच्या मैदानात; पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2019 06:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...