सुप्रिया सुळेंनी स्वत: उभ्या कपाशीवर फिरवला ट्रॅक्टर

सुप्रिया सुळेंनी स्वत: उभ्या कपाशीवर फिरवला ट्रॅक्टर

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे यांनीही उभ्या कपाशीत ट्रॅक्टर फिरवून सरकारच्या धोरणाचा निषेध केलाय.

  • Share this:

07 डिसेंबर : बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी उभ्या कपाशीत ट्रॅक्टर फिरवायला सुरुवात केलीये. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे यांनीही उभ्या कपाशीत ट्रॅक्टर फिरवून सरकारच्या धोरणाचा निषेध केलाय.

उभ्या कपाशीत फिरणारा हा ट्रॅक्टर शेतकऱ्याच्या काळजाला घरं पाडतोय. रक्ताचं पाणी करून वाढवलेली कपाशी वाढली तर खरी पण त्यावर बोंडअळीनं हल्ला चढवला. बोंड अळीचा प्रादुर्भाव एवढा की एकही बोंड गुलाबी अळीनं शिल्लक ठेवलेलं नाही. सरकार नुसत्या घोषणा करतंय पण मदत करत नाही. त्यामुळे वर्ध्यातल्या पवनारच्या हर्षल तोटेंनी हल्लाबोल यात्रेवर असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना शेतावर बोलावून उभ्या पिकावर नांगर फिरवला.

धनंजय मुंडे यांनी उभ्या कपाशीत ट्रॅक्टर फिरवला. त्यांच्यापाठोपाठ सुप्रिया सुळे यांनी बोंड अळीने नुकसान झालेल्या वर्ध्यातील पोहनेर येथील नंदकिशोर टोटे या शेतकऱ्याच्या विनंतीनुसार  बोंडअळी बाधीत उभ्या पाळाटीवर रोटा वेटर फिरवून सरकारच्या धोरणाचा निषेध केलाय.

कापूस वेचणीची मजुरीही परवडत नसल्यानं सरकारनं बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजारांची मदत करावी अशी मागणी विरोधकांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2017 09:46 PM IST

ताज्या बातम्या