S M L

जेव्हा सुप्रिया सुळे रिपोर्टिंग करतात...

खासदार सुप्रिया सुळे यांनी काल बारामती -फलटण रस्त्यावर लोकांची भेट घेतली. समस्या समजून घेतल्या. त्यांच्या मागण्या जाणल्या. इतकंच काय त्यांनी त्या मोबाईल वर रेकॉर्डही केल्या. सरकारला उत्तर देण्यासाठी सुप्रियाताईंनी स्वत: रिपोर्टिंग केलं.

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 3, 2017 01:11 PM IST

जेव्हा सुप्रिया सुळे रिपोर्टिंग करतात...

बारामती, 03 नोव्हॆंबर: राज्यातला एकही रस्ता असा नाही ज्यावर खड्डे नाहीत! खड्डे दुरूस्तीसाठी सगळ्या महाराष्ट्रातून मागणी केली जाते आहे. अशावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी स्वत: बारामती फलटण रस्त्यावर जाऊन रिपोर्टिंग केलं. लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

वाढलेले अपघात, हकनाक गेलेले बळी याला जबाबदार कोण ? सर्वत्र हेच चित्र असतांना आपले माननीय मंत्रीमहोदय चंद्रकांत पाटील मात्र खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा असं आवाहन करत आहेत.

अशावेळी सुप्रियाताई सुळे यांनी सेल्फी विथ खड्डे मोहीनमेला सुरूवात केली. याला राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही पाठिंबा दिला. तसंच चंद्रकांत पाटीलांनी दिलेल्या आव्हानाला उत्तर देण्यासही सुप्रियाताईंनी सुरूवात केलीय. खासदार सुप्रिया सुळे यांनी काल बारामती -फलटण रस्त्यावर लोकांची भेट घेतली. समस्या समजून घेतल्या. त्यांच्या मागण्या जाणल्या. इतकंच काय त्यांनी त्या मोबाईल वर रेकॉर्डही केल्या. सरकारला उत्तर देण्यासाठी सुप्रियाताईंनी स्वत: रिपोर्टिंग केलं.

कोकण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा ,विदर्भ सर्वच भागातून खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. सगळीकडूनच लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशावेळी सुप्रिया ताईंच्या मोहीमेमुळे तरी प्रशासनाला जाग येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 3, 2017 09:15 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close