काँग्रेसमध्ये विलीन होणार राष्ट्रवादी? सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

काँग्रेसमध्ये विलीन होणार राष्ट्रवादी? सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी चर्चा सुरू झाली होती. याबाबत आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

अहमदनगर, 31 मे : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरूवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी चर्चा सुरू झाली होती. याबाबत आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण या अफवा आहेत. आमची अशी कोणतीही चर्चा झाली नाही. ही चर्चा फक्त मीडियामध्ये आहे,' असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाबाबतच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

काय आहे चर्चा?

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्या इतपतही काँग्रेसला जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन केल्यास विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा होऊ शकतील. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला गेल्याची चर्चा रंगत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी हा पक्षच काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास देशाच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळू शकते. असं झाल्यास सुप्रिया सुळे यांच्या गळ्यात लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडू शकते.


VIDEO : अवमान झाल्याने शरद पवारांनी मोदींच्या शपथविधीला जाणं टाळलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2019 11:21 AM IST

ताज्या बातम्या