आधी वरण भात नीट द्या मग पुरणपोळी द्या-सुप्रिया सुळेंची मोदींवर टीका

बुलेट ट्रेन म्हणजे पुरणपोळी आहे आणि मुंबईची लोकल म्हणजे वरणभात आहे. मुंबईकरांना रोजचा वरणभात आधी नीट द्या आणि मग पुरणपोळी द्या असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2017 03:36 PM IST

आधी वरण भात नीट द्या मग पुरणपोळी द्या-सुप्रिया सुळेंची  मोदींवर टीका

पुणे, 2 ऑक्टोबर: बुलेट ट्रेनला विरोध नाही मात्र आधी लोकलची वाहतूक सुधारा असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.  बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावरून  सगळीकडून सध्या टीका होत असताना सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य केलं आहे.

बुलेट ट्रेन म्हणजे पुरणपोळी आहे आणि मुंबईची लोकल म्हणजे वरणभात आहे. मुंबईकरांना रोजचा वरणभात आधी नीट द्या आणि मग पुरणपोळी द्या असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला दिला आहे. मुंबईच्या लोकलचे प्रश्न मार्गी लावावे असं त्यांचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एल्फिन्स्टन ब्रिजवर चेंगराचेंगरी झाली होती.त्यानंतर मुंबई लोकलच्या प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि मुंबईतील रेल्वेच्या पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वच्छ भारत योजनेचा हेतू चांगला आहे असंही त्या म्हणाल्या. मात्र ही खरोखर लोकचळवळ झालीय का याचं मूल्यमापन झालं पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. स्वच्छ भारत कर आकारला जातो. त्या कराचं लेखा परीक्षण झालं पाहिजे असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

गांधी जयंती निमित्त पुण्याच्या कात्रज चौकात स्वच्छतेची वारी उपक्रमाअंतर्गत सुळे आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2017 11:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...