Elec-widget

बाल लैंगिक गुन्ह्यांच्या खटल्यांची जलद सुनावणी करा!, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

बाल लैंगिक गुन्ह्यांच्या खटल्यांची जलद सुनावणी करा!, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्यांतर्गत (पॉक्सो) दाखल झालेल्या खटल्यांची जलदगतीने सुनावणी घ्यावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने देशभरातील हायकोर्टांना दिले आहेत.

  • Share this:

02 मे : बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्यांतर्गत (पॉक्सो) दाखल झालेल्या खटल्यांची जलदगतीने सुनावणी घ्यावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने देशभरातील हायकोर्टांना दिले आहेत. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारांच्या खटल्यांसाठी तीन सदस्यीय न्यायाधीशांची समिती नेमावी. या समितीच्या देखरेखीखाली या खटल्यांची सुनावणी व्हावी, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय.

सुप्रीम कोर्टात अलख अलोक श्रीवास्तव यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने देशभरातील हायकोर्टांना पॉक्सो कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या खटल्यांची जलदगतीने सुनावणी घ्यावी, असे निर्देश दिले.

या खटल्यांची विशेष न्यायालयात सुनावणी घ्यावी आणि कनिष्ठ न्यायालयांनी या खटल्यांना अनावश्यक स्थगिती देऊ नये, यासंदर्भात सुचना द्याव्यात, असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने हायकोर्टांना दिले आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2018 09:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com