S M L

सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाला सशर्त परवानगी

शेवटचा श्वास कधी घ्यावा, हे ठरवण्याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला आहे. त्याला सन्मानानं मरण्याचा पूर्ण अधिकार आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 9, 2018 12:32 PM IST

सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाला सशर्त परवानगी

सुप्रीम कोर्टानं इच्छामरणाला सशर्त परवानगी दिली. माणसाला सन्मानानं मरण्याचा अधिकार आहे, असं महत्त्वपूर्ण विधान या प्रकरणावर भाष्य करताना सुप्रीम कोर्टानं केलं आहे. एखाद्या व्यक्तीला डॉक्टरांच्या प्रमाणपत्रानंतर इच्छामरणाची परवानगी दिली जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीनं जिवंत ठेवलं जाऊ शकत नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने हा निर्णय दिलाय. सुप्रीम कोर्टाचा हा निकाल अनेकार्थांनी महत्त्वाचा आहे.

काय म्हणालं सुप्रीम कोर्ट?

शेवटचा श्वास कधी घ्यावा, हे ठरवण्याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला आहे. त्याला सन्मानानं मरण्याचा पूर्ण अधिकार आहे. केवळ श्वास चालू आहे. म्हणून एखाद्या मरणासन्न व्यक्तीला जिवंत ठेवणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे मरणासन्न व्यक्तीनं इच्छा मृत्यूपत्र तयार केलं असेल, तर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवता येणार नाही.

या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. भूषण म्हणाले, "आम्ही अॅक्टिव्ह युथनेशिया अर्थात सक्रिय इच्छामरणाची मागणी करत नाही, ज्यामध्ये अंथरुणाला खिळलेल्या रुग्णाला इंजेक्शन देऊन मारलं जातं. तर आम्ही पॅसिव्ह युथनेशियाची अर्थात निष्क्रिय इच्छामरणाची मागणी करत आहे, ज्यामध्ये कोमात असलेल्या रुग्णाची जीवन रक्षक यंत्रणा काढणे म्हणजेच व्हेंटिलेटर बाजूला करुन,रुग्णाला जीव सोडू द्यावा".

यावर कोर्टाने प्रश्न उपस्थित केला की, रुग्ण बराच होऊ शकत नाही, हे कसं ठरवणार? यावर प्रशांत भूषण म्हणाले, हे डॉक्टर ठरवतील. सध्या याबाबत कोणताच कायदा नसल्याने अशा रुग्णांना जबरदस्तीने व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं.

Loading...
Loading...

कोमात गेलेला रुग्ण स्वत: मरणाची इच्छा व्यक्त करण्याच्या स्थितीत नसतो. त्यामुळे त्यांना अगोदरच असं लिहून ठेवण्याचा अधिकार हवा, ज्यामध्ये आपण बरं होऊ शकत नसल्यास काय करावं हे नमूद असावं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2018 12:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close