News18 Lokmat

अंधश्रद्धेचा कळस! मुलगा पुन्हा जिवंत करण्यासाठी मृतदेह आणला घरी, गावात घातला राडा

8 वर्षीय आदित्य गौतम या मुलाला साप चावल्याने त्याचा मृत्यू झाला पण तरीही आयुर्वेदिक डाक्टरांनी या मुलाला जिवंत करतो असं सांगत मृतदेह स्वताच्या घरी आणला.

News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2018 03:07 PM IST

अंधश्रद्धेचा कळस! मुलगा पुन्हा जिवंत करण्यासाठी मृतदेह आणला घरी, गावात घातला राडा

प्रविण मुधोळकर, प्रतिनिधी

गोंदिया, 16 ऑक्टोबर : गोंदिया जिल्ह्यातील घोटी गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 8 वर्षाच्या आदित्य गौतम या मुलाला साप चावल्याने त्याचा मृत्यू झाला पण तरीही आयुर्वेदिक डॉक्टरांनी या मुलाला जिवंत करतो असं सांगत मृतदेह स्व:ताच्या घरी आणला. या सगळ्या गंभीर प्रकारानंतर या आयुर्वेदिक डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

तुम्हाला हे वाचून धक्का बसेल पण मुलगा जिवंत होऊ शकतो, तुम्ही डॉक्टरांना सोडा यासाठी आज गावकऱ्यांनी रास्ता रोको करत पोलीस स्टेशनवर हल्ला चढवला. तर आपला मुलगा आताही जिवंत होऊ शकतो असा दावाच मुलाच्या आईने केला आहे.

आदित्य गौतमला सर्पदंश होऊन त्याचा मृत्यू झाला. त्याला जिल्हा रुग्णालयातर्फे मृत घोषित करण्यात आलं. मात्र अंत्यविधी होत असताना बालाघाट येथील आयुर्वेदिक डॉक्टर नवीन मोहनसिंग लिल्हारे यांनी थेट स्मशानघाट गाठून आदित्य मृत झाला नसल्याचे सांगितलं.

उपचारासाठी मला जर २४ तास दिले तर मी आदित्यला पुन्हा जिवंत करीन असा दावा त्यांनी केला. बरं इतकंच नाही तर त्यांनी आदित्यचा मृतदेह स्मशानातून घरीही नेला. पण या सगळा प्रकार पोलिसांना समजताच त्यांनी डॉक्टरांना ताब्यात घेतलं आहे.

Loading...

आता डॉक्टरांना ताब्यात घेतल्याचं समजताच गावकऱ्यांनी पोलिसांविरोधात मोर्चा काढला. आदित्य अजूनही वाचू शकतो, डॉक्टरांना सोडा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यासाठी आज गावकऱ्यांनी पोलिसांविरोधात गावात रास्ता रोको करत टायर जाळून याचा निषेध केला.

यात सगळ्यात गंभीर म्हणजे आदित्यचा मृतदेह अजूनही घरीच आहे. गावकरी आणि त्याची आई अजूनही तो जिवंत होऊ शकतो यासाठी डॉक्टरांना सोडा अशी आश्चर्यकारक मागणी करत आहेत.

कहर! एक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 16, 2018 03:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...