'आॅनलाईन टी' विक्रेता कमावतोय महिन्याला 70 हजार!

शून्य भांडवलातून सुरु केलेल्या व्यवसायावरचा एक सकारात्मक आणि इतरांना प्रेरणा देणारा रिपोर्ट.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 12, 2018 08:39 PM IST

'आॅनलाईन टी' विक्रेता कमावतोय महिन्याला 70 हजार!

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 12 मार्च : कल्पनेसोबत इच्छा आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर काय होऊ शकतं, हे औरंगाबादेतील एका तरुणानं दाखवून दिलंय आणि त्याच्या या कल्पनेनं त्यानं स्वत:च्या बेरोजगारीचा प्रश्न तर सोडवलाच मात्र इतरांनाही रोजगार दिला.  शून्य भांडवलातून सुरु केलेल्या व्यवसायावरचा एक सकारात्मक आणि इतरांना प्रेरणा देणारा रिपोर्ट.

सुनील वाघ. औरंगाबादेतील एक उच्च शिक्षित विद्यार्थी. एकेकाळी सुनीलचे स्वत:चे क्लासेस होते. मात्र काही कारणांमुळे सुनीलवर बेरोजगार होण्याची वेळ आली. यातच सुनीलनं रोजगाराची एक भन्नाट कल्पना शोधलीये. ती आहे ऑनलाईन चहाची. आता सुनीलचा हा ऑनलाईन चहाचा व्यवसाय जोरात सुरू असून महिन्याला सत्तर हजार रुपयांपर्यंत त्याची कमाई होते. तेही कोणत्याही भांडवल गुंतवणुकीशिवाय.

यासाठी सुनीलनं स्वत:ची कॉल-टी वेबसाईट तयार केलीये. त्याने औरंगाबाद, कल्याण, पुणे, नाशिक या ठिकाणीही बेरोजगारांना काम दिलं आणि त्यांना मालक बनवलं. सुनीलनं चहाचा आयुर्वेदिक मसाला वनस्पतींपासून तयार केलाय.

मेहनत करायची तयारी असेल तर कमी भांडवलातही चांगली कमाई करता येते, हे सुनीलनं दाखवून दिलंय. सुरुवातीला सुनीलच्या पत्नीला हा व्यवसाय आवडला नाही. मात्र तिनं पतीला साथ द्यायचा निर्णय घेतला. त्यामुळे सुनील आणि त्याची पत्नी शीतल पाहुण्यांसाठी चहा बनवत नाहीत तर चहाची ऑनलाईन विक्री करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2018 08:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...