भ्रष्टाचार उघड केल्यानं कृषी आयुक्त केंद्रेकरांची बदली- खा. राजू शेट्टी

कृषीसेवकांच्या भर्ती घोटाळ्यात ही त्यांनी विशेष लक्ष दिलं होतं. या प्रकरणाच्या चौकशीचे काम सुनील केंद्रेकर करत असल्यामुळे पोलीस तपासालादेखील वेग आला होता.यामुळेच त्यांची बदली केल्याचं आरोप होतो आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 1, 2017 08:51 AM IST

भ्रष्टाचार उघड केल्यानं कृषी आयुक्त केंद्रेकरांची बदली- खा. राजू शेट्टी

1 सप्टेंबर: कृषी आयुक्त सुनिल केंद्रेकर यांची सरकारने अचानक मुदतपूर्व बदली केली आहे. यामुळे सरकराच्या विरोधात नाराजीचे सुर उमटत आहेत. केंद्रेकर यांनी भ्रष्टाचार विरोधी काम केल्यामुळे त्यांची बदली केली असा आरोप  खासदार राजू शेट्टींनी केला आहे.

केंद्रेकर यांनी कृषी आयुक्तपदाचा चार्ज घेतल्यापासून अनेक महत्त्वाची काम मार्गी लावली आहेत. ग्रामपंचायतीकडून राबवण्यात येणाऱ्या योजना राबवणं सुलभ व्हावं यासाठी ग्रामपंचायती कृषी खात्याला ऑनलाईन जोडण्याच काम त्यांनी हाती घेतलं होतं. शेतकऱ्यांना एक लाख रूपयात ट्रॅक्टर मिळवून देण्यासाठी केंद्रेकर प्रयत्नशील होते. महत्त्वाचं म्हणजे कृषीसेवकांच्या भर्ती घोटाळ्यात ही त्यांनी विशेष लक्ष दिलं होतं. या प्रकरणाच्या चौकशीचे काम केंद्रेकर करत असल्यामुळे पोलीस तपासालादेखील वेग आला होता.यामुळेच त्यांची बदली केल्याचं आरोप होतो आहे.

त्यांनी ठिबकमधील लुटारूंना लगाम घातला होता. राज्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे ठिबक अनुदान हडप करणारी टोळी कृषी आयुक्तालयाच्या फलोत्पादन विभागात काम करते आहे. या टोळीला लगाम घालण्याचे काम सुनील केंद्रेकर करत होते. त्यामुळे या लॉबीनेच केंद्रेकरांची बदली करायला सरकारला भाग पाडलं अशी चर्चा सुरू आहे.

आता सरकार कधी तरी चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीशी उभं राहणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2017 08:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...