सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

वीज बिल न भरणे, कर्ज न भरणे असे स्वरूप असणार असून सर्व शेतकरी संघटना सरकारविरोधात आंदोलन करणार आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 2, 2018 09:26 PM IST

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02 फेब्रुवारी : सुकाणू समितीनं एक मार्चपासून राज्यभरात असहकार आंदोलनाचा इशारा दिलाय. कर्जमाफी आणि हमीभावाची सकारकडून अंमलबजावणी झाली नाही तर सुकाणू समिती एप्रिल महिन्यापासून असहकार आंदोलन छेडणार आहे.

शेतकरी संघटनांच्या सुकाणू  समितीनं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडणवीस यांना निवेदन दिलं. सरकार फक्त आश्वासन देतंय आणि थापा मारतंय असा आरोप सुकाणू समितीनं केलाय.

या निवेदनाद्वारे शेतकरी कर्जमाफी बद्दल तसंच हमीभावाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सुकाणू समिती एक मार्चपासून राज्यात असहकार आंदोलन छेडणार असल्याचं सुकाणू समितीने जाहीर केले आहे.

वीज बिल न भरणे, कर्ज न भरणे असे स्वरूप असणार असून सर्व शेतकरी संघटना सरकारविरोधात आंदोलन करणार आहे.

शेतमालावरची निर्यात बंदी उठवावी, शेतकरीविरोधी कायदे रद्द करावे, तसंच हमीभाव केंद्र सुरू करावीत अशी मागणी सुकाणू समितीनं केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2018 09:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...