News18 Lokmat

उच्चाधिकार मंत्रिगट आणि सुकाणू समितीची रविवारी बैठक

या बैठकीत या बैठकीत शेतकरी कर्जमुक्तीचा मसुदा तयार होणार असल्याची माहिती मिळतेय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 9, 2017 11:09 PM IST

उच्चाधिकार मंत्रिगट आणि सुकाणू समितीची रविवारी बैठक

09 जून : शेतकरी संपावर तोडगा काढण्यासाठी रविवारी उच्चाधिकार मंत्रिगट आणि सुकाणू समितीच्या सदस्याची बैठक होणार आहे. या बैठकीत या बैठकीत शेतकरी कर्जमुक्तीचा मसुदा तयार होणार असल्याची माहिती मिळतेय.

कर्जमाफीसह शेतकर्‍यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून मंत्रिगट नियुक्त करण्यात आलीये. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात एका उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे.

आज ही समिती स्थापन झाल्यानंतर सुकाणू समितीनेही चर्चेसाठी पुढे पाऊल टाकले आहे. रविवारी  11 जून रोजी  सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 1 वाजता मंत्रिगट आणि सुकाणू समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकरी कर्जमुक्तीचा मसुदा तयार होणार असल्याचं कळतंय.

सुकाणू समितीच्या पाच सदस्यांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय. पुणतांब्याच्या तीन शेतकरी प्रतिनिधीही या बैठकीला हजर असणार आहे.  स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू रघुनाथदादा पाटील यांच्याशी समिती चर्चा करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2017 11:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...