आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे केली इच्छा मरणाची मागणी

वाशिम जिल्ह्याच्या जऊळका रेल्वे गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी दत्ता लांडगे यांच्या पत्नी सोनाली लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2019 04:30 PM IST

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे केली इच्छा मरणाची मागणी

किशोर गोमाशे,(प्रतिनिधी)

वाशिम, 2 ऑगस्ट- जिल्ह्याच्या जऊळका रेल्वे गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी दत्ता लांडगे यांच्या पत्नी सोनाली लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. शासनाने दिलेली नोकरी हिसकावून घेतल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळआल्याचे सोनाला लांडगे यांनी म्हटले आहे.

सोनाली लांडगे यांचे शेतकरी पती दत्ता आत्माराम लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहून 10 सप्टेंबर 2015 रोजी आत्महत्या केली होती. त्या पत्रात त्यांनी नापिकीला व कर्जाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सोनाली लांडगे यांना वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 20 सप्टेंबर 2015 रोजी मदतनीस पदावर नेमणूक दिली होती. त्यांना दरमहा मिळणारे 7 हजार रुपये मानधन त्यांच्या व त्यांच्या मुलांच्या उपजिविकेचे साधन होते. कोणतेही कारण नसताना जिल्हाधिकाऱ्यांनी 11 जून  2018 ला सोनाली लांडगे यांना सेवेतून कमी केले होते.उपजिविकेचे साधन गेल्याने त्यांच्यासह त्यांच्या मुलांवर उपासमारीची वेळ आली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री डॉ.रणजित पाटील, आमदार अमित झनक यांच्याकडे सेवेत सामावून घेण्याची वारंवार मागणी केली. परंतु, आजपर्यंत त्यांना सेवेत सामावून घेतले नाही. अखेर शुक्रवारी सोनाली लांडगे यांनी मालेगाव तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे सेवेत सामावून घ्या अन्यथा इच्छा मरणाची परवानगी दया, अशी मागणी  केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची विधवा पत्नी सोनाली लांडगे या विधवा शेतकरी महिलेची जगण्यासाठी जर अशी फरफट होत असेल तर इतरांचे काय, असा सवाल उपस्थित झाला आहे.

FACEBOOK VIDEO: डोंबिवली स्टेशनवर जीवघेणी गर्दी, प्रशासनाला जाग कधी येणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: washim
First Published: Aug 2, 2019 03:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...