गरीबांची साखर झाली कडू; रेशनवर मिळणाऱ्या साखरेचे दर वाढवले!

दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला पूर्वीप्रमाणे साखर देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला होता. मात्र केंद्र सरकारने हा प्रस्ताव फेटाळून लावला.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 8, 2018 09:24 AM IST

गरीबांची साखर झाली कडू; रेशनवर मिळणाऱ्या साखरेचे दर वाढवले!

08 मार्च : गरीबांची सारख आता कडू झाली आहे. दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला पूर्वीप्रमाणे साखर देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला होता. मात्र केंद्र सरकारने हा प्रस्ताव फेटाळून लावला. स्वस्त धान्य दुकांनांतील साखर आता दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना मिळणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने गरीब कुटुंबांसाठी कडवट निर्णय घेतला आहे असंच म्हणावं लागेल.

राज्यातील 45 लाख कुटुंबांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत काल लेखी उत्तरात ही माहिती दिली. मात्र दुसरीकडे अंत्योदय योजनेतील गरीब कुटुंबाना रेशनवर मिळणाऱ्या साखरेचे दर वाढवले आहेत.

अंत्योदय योजनेतील कुटुंबाना रेशनवर १ किलो साखर पूर्वी १५ रुपये किलो दराने मिळायची. पण आता हा दर १५ रुपयांवरून २० रुपये करण्यात आला आहे. जी गोरगरीबांना परवडणारी नाहीये.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 8, 2018 09:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close