S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

बीड जिल्ह्यात आठ साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू

यात वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक भाव देऊ असं जाहिर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याकडं वळवलंय. दुष्काळी भागातील बीड जिल्ह्यात यावेळी पाऊस मेहेरबान झाल्याने ऊस चांगला झालाय

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 12, 2017 12:00 PM IST

बीड जिल्ह्यात आठ साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू

बीड,12 नोव्हेंबर: यावर्षी चांगला पाऊस झाल्यान बीड जिल्ह्यातल्या आठ साखर कारखान्यांचे गळीत हंगाम जोरात सुरु झालेत. यात वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक भाव देऊ असं जाहिर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याकडं वळवलंय. दुष्काळी भागातील बीड जिल्ह्यात यावेळी पाऊस मेहेरबान झाल्याने ऊस चांगला झालाय. त्यामुळे मागील वर्षी बंद असलेले कारखानेही आता सुरू होत आहेत. कारखाने सुरू झाल्यानं जिल्ह्यातलं राजकारणही तापण्यास सुरवात झालीय. साखर कारखाने हे ग्रामीण भागात राजकारणाची केंद्र असतात. त्यामुळं शेतकऱ्यांना आपलसं करण्याचा प्रयत्न राजकारणी करत असतात. बीड जिल्ह्यात साखर कारखान्यांवर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वर्चस्व आहे

बीड जिल्ह्यात एकून 11 साखर कारखाने आहेत. यंदा विक्रमी 8 कारखाने सुरु आहेत.गेल्या तीन वर्षात पहिल्यांदाच एवढे कारखाने सुरु आहेत. शेतकरी आणि मजुरांना चांगलाच फायदा

होईल असं दिसतंय. तसंच ग्रामीण अर्थव्यवस्थेस बळकटी मिळू शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 12, 2017 11:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close